महाराष्ट्र

रि. पा. ई. कांबळे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष दर्शनाताई जाधव यांना न्याय द्या! बी सी कांबळे गटाची मागणी!

रि पा ई कांबळे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष
दर्शनाताई जाधव यांना न्याय द्या!
बी सी कांबळे गटाची मागनी

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी:-

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बी सी कांबळे गटाच्या जिल्हाध्यक्षा आयुष्यमती दर्शना जाधव यांचे गेल्या महिन्या पूर्वी काही अज्ञात समाजकंटकाने वाझरे ता.दोडामार्ग, येथील राहत्या गावचे घर अजातांनी पेटवून दिले होते त्याबाबत दर्शना जाधव यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून न्यायची याचना केली होती., पोलिसांनी कोणत्याच प्रकारची कारवाई न केल्यामुळे
या घटनेला महिना उलटत नाही तोपर्यंत त्यांचे रोजी रोटीचे साधन असणारे दोडामार्ग येतील मच्छी मार्केट मधील दुकान देखील अज्ञात लोकांनी जाळले आहे याबाबत सिंधुदुर्ग तालुक्यातील दोडा मार्ग तालुक्यात आंबेडकरी चळवळीमध्ये एकच खळबळ उडाली असून , स्थानिक कार्यकर्त्याकडून देखील , अज्ञात समाजकंटकावर कारवाईची मागणी होत आहे
या जळीत कांडाची स्थानिक ग्रामसेवक यांनी योग्य रीतीने पंचनामा करून शासनाकडे सादर केलेला आहे शासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन संबंधित आरोपीचा छेडा लावून त्याला तात्काळ जेरबंद करावे
दर्शनाताई जाधव यांना तात्काळ मदत जाहीर करावी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बापूसाहेब कांबळे गटाच्या वतीने केंद्रीय उपाध्यक्ष, बाबा साहेब वडगावकर, केंद्रीय उपाध्यक्ष श्याम डीगले, दलितमित्र डॉ. प्रताप मधाळे प्रभारी महाराष्ट्र प्रदेश कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दिनकर कांबळे जगदीश सुर्यवंशी, किसन सावंत, नंदू कांबळे, राजन पिडाळकर , सतीश घाटगे, सुर्वे साहेब, आणि दर्शना ताई जाधव यांच्या समवेत जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरिक्षक दोडामार्ग तालुका, जिल्हा सिंधदुर्ग यांची भेट घेऊन , पक्षाच्या वतीने निवेदन सादर , करत कारवाईची मागणी केलेली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!