शहीद भगतसिंग,सुखदेव व राजगुरू यांना सांगली आयटक निवारा भवन येथे भावपूर्ण आदरांजली!

शहीद भगतसिंग,सुखदेव व राजगुरू यांना सांगली आयटक निवारा भवन येथे भावपूर्ण आदरांजली!
या स्वातंत्र्यवीर शहिदांना पुष्पहार घालून निवारा भवन मध्ये त्यांना आदरांजली घोषणा देऊन अर्पण करण्यात आली. याप्रसंगी बोलताना कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की,92 वर्षांपूर्वी शहीद सुखदेव भगतसिंग राजगुरू यांनी ब्रिटिश सरकारने कामगार विरोधी काळा कायदा मंजूर करू नये यासाठी पार्लमेंट मध्ये आवाज बॉम्ब टाकला व स्वतःला अटक करून घेतली त्यानंतर इंग्रजांनी या तीनही स्वातंत्र्य क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा सुनावली. यासंदर्भात बोलताना शहीद भगतसिंग यांनी सांगितले की आमच्या मृत्यूबद्दल भारतीना जरा जरी दुःख वाटत असेल तर त्यांनी या देशातील हिंदू मुस्लिम ऐक्य मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
या शहीद भगतसिंग यांच्या स्वप्नाची आज काय अवस्था या देशात जातीवादी पक्षाने करून ठेवलेली आहे हे आपल्या लक्षात आलेले आहे. दररोज निवडणुकीच्या मार्गातून सत्ता मिळवण्यासाठी हिंदू मुस्लिम ऐक्य मजबूत करण्याऐवजी हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये दंगली भडकावून राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम सध्या सत्ताधाऱ्यांच्या मार्फत सुरू आहे. शहीद भगतसिंग यांनी असेही सांगितले आहे की. देशाचे स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचे असून आमच्या बलिदानामधून जनतेमध्ये स्वातंत्र्याची प्रखर प्रेरणा निर्माण व्हावी हीच आमची इच्छा होती.
परंतु आज आपण पाहत आहोत की दिल्ली सारख्या शहरांमध्ये मोदी हटाव देश बचाव अशी पोस्टर्स लावले म्हणून हजारो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे. राहुल गांधी यांनी भारताबाहेर जाऊन भारतातील वस्तुस्थिती मांडली म्हणून त्यांच्यावर खटला दाखल करण्याचे कारस्थान करून ते खासदार कसे राहणार नाहीत असे भाजप मार्फत कारस्थान सुरू आहे.
म्हणूनच ज्या स्वातंत्र्यासाठी शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू फासावर चढले ते स्वातंत्र्य आज देशांमध्ये धोक्यात आलेले आहे. म्हणून परत एकदा दुसऱ्या स्वातंत्र्याची चळवळ करून त्यासाठी देशात कामगार कष्टकऱ्यांच्या बाजूने संघर्ष निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
याप्रसंगी कॉ विशाल बडवे, कॉ सुमन पुजारी, कॉ सना मुल्ला, कॉ वैभव बडवे, कॉ उमेश जाधव कॉ करण काळे इत्यदिनी या आदराजली कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला.