महाराष्ट्र

महाड येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीची अभिवादन क्रांती सभा संपन्न

महाड येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीची अभिवादन क्रांती सभा संपन्न

प्रतिनिधी नागपूर// रजत डेकाटे

चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या 96 व्या वर्धापन दिनानिमित्त महाड येथे 20 मार्च 2023 रोजी दुपारी 4 वाजता जगप्रसिद्ध लॉंगमार्च प्रणेते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार आदरणीय प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये क्रांती भूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीची अभिवादन क्रांती सभा संपन्न झाली . सभा सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व क्रांती स्तंभाला आदरणीय कवाडे सर व जयदीपभाई कवाडे यांनी अभिवादन केले.याप्रसंगी या क्रांतीसभेला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवा नेते जयदीप कवाडे पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदासजी इंगोले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार गोंधळी प्रदेश प्रवक्ते व कोकण संपर्कप्रमुख राजेश जाधव मुंबई प्रदेशाध्यक्ष विजय वाघमारे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सोमनाथ भोसले इत्यादी नेत्यांनी मार्गदर्शन केले तर मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक रायगड जिल्हाध्यक्ष सितारामपंत कांबळे यांनी केले.
यावेळेस या सभेला मुंबईतील प्रमुख नेते अण्णाप्पा शिंगे , आनंद कडाळे,उमेश वाघमारे, पवार, विश्वास जाधव, अन्वरभाई ,लताताई नागावकर,सचिन तांबे,सुशील गंगावणे, यासह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने क्रांती मंचावर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!