आरोग्य

सीपीआर मध्ये इनरव्हील क्लब आणि मारर्वलस यांच्यावतीने रुग्णांच्या सेवेसाठी ॲम्बुलन्स सुपूर्द करण्यात आली

इनरव्हील आणि मार्वलस यांच्या वतीने सीपीआर ई – अम्बुलन्स प्रदान – डिन दीक्षित यांनी चालवत केला स्विकार कोल्हापूर – इनरव्हील क्लब इन कोल्हापूर आणि मार्वलस इंजिनिअरिंग यांच्या सहयोगाने छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय कोल्हापूर यांना ई – ॲम्बुलन्स प्रदान करण्यात आली. चावी इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१७ च्या चेअरमन महानंदा चंदरगी यांच्या हस्ते छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय कोल्हापूर चे डीन डॉक्टर प्रदीप दीक्षित यांच्याकडे सुपूर्द केल्यावर त्यांनी स्वत: चालवत या वाहनाचा स्विकार टाळ्याच्या गजरात स्विकार केला . . सीपीआर रुग्णालयाचा परिसर खूप मोठा असल्याने रुग्णांच्या अंतर्गत ने – आण करण्यामध्ये खूप अडचणी येत होत्या ही बाब सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्हास प्रकर्षाने जाणवत होती या ई – अँब्युलन्स मुळे सीपीआर प्रशासनाला हा प्रश्न सोडविण्यात खूप मोठी मदत होईलच असा आशावाद प्रकल्प समन्वयक उत्कर्षा पाटील यांनी व्यक्त केला . तर महानंदा चंदरंगी यांनी ‘ महाराष्ट्रातील पहिलाच हा आदर्शवत प्रकल्प असल्याचे नमूद करत त्यांचे अनुकरण होत राहो ‘ अश्या शब्दात शुभेच्छा दिल्या . मार्वलस इंजिनियर्स चे मॅनेजिंग डायरेक्टर व पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील ‘ सामाजिक बांधिलकीचा हा प्रकल्प सर्वांसाठी प्रेरणादायी ठरावा अशा शब्दात आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या . माझ्यासह सर्वच आरोग्य क्षेत्रातील सर्वांचे नैतिक बळ वाढवणारा असा हा उपक्रम असल्याच्या भावना डिन प्रदीप दीक्षित यांनी यावेळी व्यक्त केल्या . या सोहळ्यास मार्वलसचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर गौरव पाटील, कान, नाक, घसा विभाग प्रमुख डॉ. अजित लोकरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीष कांबळे, प्रशाकीय अधिकारी महेंद्रसिंग चव्हाण, डॉ . सुधीर सर्वोदे ,इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या प्रेसिडेंट विद्या पठाडे, इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या प्रेसिडेंट पल्लवी मूग, इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजच्या प्रेसिडेंट सोनाली पटेल, इनर व्हील क्लबच्या सदस्या तसेच रोटरी सह वैघकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!