डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अडून कोणी राजकारण करत असेल तर जशास तसे उत्तर देऊ
पुतळा समितीने सुचवलेल्या जागेवर लवकरच भूमिपूजन

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अडून कोणी राजकारण करत असेल तर जशास तसे उत्तर देऊ
पुतळा समितीने सुचवलेल्या जागेवर लवकरच भूमिपूजन
शिरोळ / प्रतिनिधी
न्यायालयाच्या जागेवर तांत्रिक अडचण असल्याने पुतळा त्या ठिकाणी नाही हे जवळपास निश्चित झाले असतानाही काही समाजातील स्वयंघोषित कार्यकर्त्यांनी आपली दुकानदारी कायम सुरू ठेवावी यासाठी किंवा कुणाची तरी मर्जी सांभाळण्यासाठी सुपारी बहाद्दरांनी चालवलेला खटाटोप कदापि यशस्वी होणार नाही.अशा दिशाभूल करणाऱ्या ढोंगी कार्यकर्त्यापासून तमाम दलित बांधवांनी सावध रहावे आशा संतप्त भावना शिरोळ तालुक्यातील विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या शाहूनगर येथील बौद्धविहारात आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त केल्या.बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरपीआयचे अब्दुल बागवान होते.यावेळी पुतळा समितीचे उपाध्यक्ष विजय पवार उपस्थित होते.यावेळी भन्ते यश काश्यपायन यांनी पुतळा समितीच्या बैठकीत उपस्थित राहून आशीर्वाद दिले.
प्रारंभी माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी निवडणूकित दिलेले आश्वासन पाळले आहे. जयसिंगपूर येथील क्रांती चौक परिसरात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी नगरपालिकेच्या व बसस्टँड परिसरातील जागेचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
यड्रावकर यांच्या पुढाकाराने क्रांती चौकात पुतळा साकारतोय हे शल्य मनात ठेवून सुपारी बहाद्दर कार्यकर्ते यड्रावकर विरोधकांना एकत्र करून मंजूर न होणाऱ्या जागेसाठी आगडोंब ओकत आहेत.यांनीच मागासवर्गीय समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे,या कार्यकर्त्यांचे सामाजिक योगदान काय याचे आत्मचिंतन केले आहे का ?असा सवाल या बैठकीत उपस्थित करण्यात आला.
विरोधासाठी विरोध करणाऱ्या नेते मंडळींनी तरी या पुतळ्याच्या जागेसंदर्भात माहिती घेतली आहे का?मग खरे काय खोटे काय याची पडताळणी करायला हवी होती अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.
संतोष आठवले म्हणाले मागासवर्गीय बांधवांची दिशाभूल करून खोटे व बिनबुडाचे आरोप सोशल मिडियाच्या करत आहेत त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज आहोत
आरपीआयचे नेते जयपाल कांबळे म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत जे राजकारण सुरू आहे ते दुर्दैवी व मनाला हळहळ वाटणारी आहे.या तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील असल्याने त्यांच्या माध्यमातून पुतळा उभारणीचे काम सुरू आहे. या चांगल्या कार्यास शुभेच्छा व पाठिंबा देण्याऐवजी काही कार्यकर्त्यांनी मी सगळ्यांपेक्षा वेगळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
क्रांती चौक परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व्हावा यासाठी गेली पंधरा वर्षे आमची मागणी आहे. आम्हालाही वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करता येतात, बोलत येतं आम्ही गप्प आहोत याचा अर्थ वेगळा काढू नये असा इशाराही अप्रत्यक्षरित्या आंदोलनकर्त्यांना दिला आहे
पारंभी स्वागत व प्रास्तविक खजिनदार उत्तम वाघवेकर यांनी केले. सचिव डॉ.सुभाष सामंत यांनी पुतळ्याबाबतचे ठराव व कागदपत्रांचे वाचन केले.
1)या बैठकीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जयसिंगपूर मध्यवर्ती ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रयत्न करून करण्याची जागा निश्चित केल्याप्रकरणी अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
2)डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसस्टँड परिसरातील जागेमध्ये उभा करावा व परिसर स्वछ व सुशोभित करावा
3) माजी उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर व मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी यांच्या अभिनंदनाचा ठराव जेष्ठ पत्रकार सुरेश कांबळे यांनी मांडला.
यावेळी दत्तवाड चे सरपंच चंद्रकांत कांबळे सर ,सुरेश कांबळे (कवठे गुलंद),आनंदा शिंगे,सुनिल कुरुंदवाडे,सेनापती भोसले,संजय शिंदे,विश्वास कांबळे,बी.आर.कांबळे,सूर्यकांत कांबळे,अभिजित आलासकर,संदीप बिरणगे,अनिल लोंढे,सौ.सुनिता पवार ,सुरेश कांबळे (गौरवाड), यांनी मनोगते व्यक्त केले.बसवराज कांबळे,किरण भोसले,सुरज कांबळे,रंगराव कांबळे, सुरज शेळके,उल्हास भोसले,धम्मपाल ढाले,अभिनंदन कर्णिक,पूनम धनवडे ग्रामपंचायत सदस्य निमशिरगाव,सौ.वंदना हिरवे,विजय खातेदार, अस्लम मुल्ला,हुसेन शेख,अमरदिप कांबळे,केंदवा कांबळे,भिकाजी खातेदार,अवधूत कांबळे, संतोष कडाळे ,उदय कांबळे,प्रमोद कांबळे ,अक्षय कांबळे, आशुतोष कांबळे, यश शिरोळकर, वसंत संजय, किरण भोसले, सुधीर आदमाने अभिनंदन कुरणे, प्रमोद कांबळे, चंद्रकांत कांबळे,दादासो कांबळे,नटराज माळगे,कल्लाप्पा कडाळे,सर्जेराव धनवडे, बाळासो कांबळे विक्रम माने, स्वप्नील श्रीधनकर आदी उपस्थित होते.आभार बाळासाहेब कांबळे यांनी मानले