कोल्हापूर

विशिष्ट जागेचा आग्रह धरून डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरून राजकीय पोळी भाजून घेणाऱ्यांना आंबेडकरी जनता माफ करणार नाही – संतोष आठवले

विशिष्ट जागेचा आग्रह धरून डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरून राजकीय पोळी भाजून घेणाऱ्यांना आंबेडकरी जनता माफ करणार नाही – संतोष आठवले

जयसिंगपूर दि .
विशिष्ट जागेचा आग्रह धरून डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरून राजकीय पोळी भाजून घेणाऱ्यांना आंबेडकरी जनता माफ करणार नाही असे प्रतिपादन पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले यांनी केले
जयसिंगपूर शहरामध्ये जुन्या कोर्टाच्या आवारातच आंबेडकर पुतळा बसवावा या संदर्भातील आंदोलनाच्या बाबतीत त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, विधानसभा निवडणुकीदरम्यान बहुजन मिशन संघटनेने डॉ . राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जाहीर पाठिंबा दिला होता हा पाठिंबा देत असताना जयसिंगपूर शहरांमध्ये मध्यवर्ती ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसावा हि
आग्रही मागणी बहुजन मिशन ने केली होती . जयसिंगपूर शहरात मध्यवर्ती ठिकाणीच भव्य पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा असे हि एकमताने ठरले होते . त्यावेळी पूतळा ज्युन्या कोर्टाच्या आवारातच बसवला पाहिजे हि मागणी करण्यात आलेली नव्हती.
शिरोळ तालुक्यातील आंबेडकरवादी जनतेची आंबेडकर पुतळा मध्यवर्ती ठिकाणी बसवण्याची मागणी लक्षात घेऊन विद्यमान आमदार माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पुतळा बसवण्याची अभिवचन दिले होते. त्या अनुषंगाने पूतळा उभारण्याची योग्य कायदेशीर प्रक्रिया सूरु असताना केवळ व्यक्ती द्वेष मनामध्ये ठेवून व निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन राजकिय रंग देण्याचा कूटिल डाव काही विघ्न संतोषी लोकांकडून सुरू आहे या शहरातील व शिरोळ तालुक्यातील आंबेडकरी जनता बळी पडणार नाही. आजपर्यंत शिरोळ तालुक्यातील लोकप्रतिनिधी माजी खासदार राजू शेट्टी ही दोन वेळा खासदार होते एक वेळा आमदार एक वेळा जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी आमदार उल्हास दादा पाटील यांनी तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व केले आहे दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांची पिताश्री दिवंगत नेते सा रे पाटील हे हि शिरोळ तालुक्याचे आमदार होते तेव्हा या लोकप्रतिनिधीने जयसिंगपूर शहरांमध्ये मध्यवर्ती ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवावा या संदर्भातील मागणी केलेली नव्हती मगआत्ताच का आंदोलना पाठींबा देण्यात अग्रेसर आहेत आज पर्यंत झालेल्या या लोकप्रतिनिधीने आंबेडकरी जनतेची अनेक शैक्षणिक आर्थिक व मूलभूत प्रलंबित प्रश्नांच्या बाबतीत विधिमंडळामध्ये एकही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला नाही त्यांचे हे आंबेडकरी समाजाबद्दलचे प्रेम बेगडी आहे हे स्पष्ट आहे .मुळात हे आंदोलन करणाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जयसिंगपुरात शहरात होऊ नये म्हणूनच न्यायालयाच्या ताब्यातील जागेचा वाद पुढे करून विषय वादग्रस्त करण्याचा यांचा प्रयत्न आहे तो आंबेडकरी जनता हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही असे हि आठवले यांनी म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!