डॉ .आंबेडकर पुतळा समितीच्या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारलेले नाही – माजी खास .राजू शेट्टी

शिरोळ प्रतिनिधी
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयसिंगपूर येथील मध्यवर्ती ठिकाणी क्रांती चौक परिसरात शासकीय जागेमध्ये पूर्णाकृती पुतळा उभा करण्यास कोणाचाही विरोध नाही मी कोणत्याही पुतळा समितीच्या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारलेले नाही तथापि सर्व तालुक्यातील तमाम दलित नेते व कार्यकर्त्यांनी पुतळा उभारण्याच्या कामात प्रतिष्ठा आणि राजकारण न आणता एकोप आणि एकसंघपणा दाखवून जयसिंगपूर नगरीच्या वैभवात भर घालणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या रूपाने एक भव्य आणि दिव्य स्मारक होत आहे ते पूर्ण करण्यासाठी सर्व दलित बांधवांनी आपापसातील मतभेद टाळावेत आणि तमाम दलितांची एकजूट दाखवावीअसे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ येथे पत्रकारांशी बोलताना केले
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा एकच असल्याने जयसिंगपूर नगरीला छत्रपती शाहू महाराजांचा स्पर्श झाल्याने या भूमीला विशेष महत्त्व आहे या पुण्यभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा राहतोय ही खरोखरच जयसिंगपूर नगरीला भूषणावह आहे ते पुढे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र कष्ट घेऊन देशाला संविधान दिले आहे या संविधानामुळेच मी शिवार ते संसद हा प्रवास माझा केलेला आहे जयसिंगपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णा कृती पुतळा उभा करण्यात येत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करत असताना पुतळ्याच्या अडून कोणीही राजकारण करू नये राजकीय मतभेद असू शकतात पक्ष आणि गटातटाचे राजकारण ही असू शकते मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा राहत असताना राजकारण आणि प्रतिष्ठा कोणी पणाला लावू नये कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व धर्मियांचे महान नेते होते याची नोंद आपण घेतली पाहिजे असे सांगून माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले पुतळा उभारणे कामी सर्व दलितसमाज बांधवांच्या पाठीशी राहीन दरम्यान नुकतेच माझ्या कामानिमित्त मी जिल्हाधिकारी यांच्याकडे गेलो असता त्या ठिकाणी पुतळ्याच्या जागेसाठी दलित नेते मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मला भेटले जिल्हाधिकाऱ्यांची भेट घडवून द्या असे सांगितले त्यानंतर मी जिल्हाधिकारी यांना विनंती केली या दलित नेत्यांचे काय निवेदन आहे ते पहावे त्यावर जिल्हाधिकारी यांनी आपल्या निवेदनाबाबत शासनाचे मार्गदर्शन घेऊन आपणास कळवतो असे सांगितले या अगोदर पुतळ्यासंदर्भात मला मला काहीही माहिती नव्हती मी कोणत्याही पुतळा समितीचे आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारलेले नाही माझ्या तालुक्यातील सर्वच दलित बांधव मला सारखे आहेत कोणाचे नेतृत्व घेऊन मी दलित बांधवांच्या मध्ये फूट पाडणार नाही दलित बांधवांची एकजूट कसी टिकवता येईल यासाठी यापुढे माझा प्रयत्न राहील असे त्यांनी शेवटी सांगितले