कोल्हापूर

रचनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कोतुकाने देणारा मायेचा स्पर्श..

रचनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कोतुकाने देणारा मायेचा स्पर्श..
कोल्हापूर –
कोल्हापूर जिल्ह्यातील कला साहीत्य संगीत चित्रपट नाटय शैक्षणिक आरोग्य आदी क्षेत्रात आपल्या लक्षवेधी कामगिरीने समाजाचे लक्ष वेधून घेणाऱ्या लोकांना समाजाकडून कोतुक केले जाते ही भावनाच मोठी आहे कोल्हापूर प्रेस क्लबचे नूतन अध्यक्ष शीतल धनवडे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर कार्याध्यक्ष दिलीप भिसे सचिव बाळासाहेब खाडे यांचा सत्कार हृदयस्पर्शी चे पद्माकर कापसे यांनी केले शाहू स्मारक भवन येथील सभागृहात हा स्नेहसत्काराचा समारंभ संपन्न झाला..

या सत्कार सोहळ्याच्या प्रारंभीच अर्हन मिठारी या 11 वयीन बालकलाकाराने वाद्यांच्या दुनियेत सर्वाधिक कठीण असणारे सेक्सअफोन वाजवून सर्वांना मंत्रमुग्ध केले..तसेच करवीर साहित्य परिषदेकडून विविध प्रकारे साहित्य निर्मिती करणाऱ्या लेखकाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे गुरुबाळ माळी ,श्रीमती जयश्री जयशंकर दानवे यांनाही सन्मानित करण्यात आले
शासकीय अनुदान प्राप्त अशा पुस्तकाची निवड करून साहित्यिक पुरस्कार लाभलेले लेखक विकास कुलकर्णी,यांच्यासोबत दीड वर्षांत जवळपास 200 हुन अधिक नेत्रशल्य चिकित्सा।मोफत करून या शिबिराद्वारे 25 हजाराहून अधिक लोकांचे डोळे तपासलेले आहेत शा कृ पंत वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलचे नेत्रशल्य विशारद डॉ वीरेंद्र वनकुद्रे तसेच पहिल्याच प्रयत्नात आणि पश्चिम महाराष्ट्रात मुलीत प्रथम क्रमांकाने सी . ए . परिक्षा उत्तीर्ण झालेल्या कु.शीतल भिवटे तसेच शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते…यांची शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या सहकारी बँकेच्या संचालक पदी निवड झालेले संभाजी जगदाळे शिवाजी विद्यापीठ सिनेट पदी सर्वोच्च मताधिक्याने निवडून आलेल्या कु अभिषेक मिठारी यांचा तसेच प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय परेडसाठी जिल्ह्यातील एकमात्र निवडलेली मुलगी कु वैष्णवी साळोखे सेक्साफोन वाद्य लीलया वाजवून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत विजेता ठरलेल्या अर्हन मिठारी या सर्वांचा नॅपकिन बुके स्मृतिचिन्ह पुस्तक आणि चिमण्याचे घरटे देऊन सत्कार करण्यात आला.. स्वागत आणि प्रस्तावना हृदयस्पर्श पद्माकर कापसे यांनी केली.. आरोग्य मित्र राजेंद्र मकोटे यांनी सर्वांचा परीचय करून दिला… शेवटी पद्मिनी कापसे यांनी महाराष्ट्र राज्यगीत लाभलेले ‘ गर्जा महाराष्ट्र माझा ‘ या गीताने या हृदयस्पर्शी सोहळ्याची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!