विशेष लेख

हंगामी शिवभक्त ?

हंगामी शिवभक्त ?

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
“भट बोकड मोठा” या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

“शिवाजी महाराज हे नुसते नाव जरी उच्चारले तरी हिंदूंच्या तेहतीस कोटी देवांची फलटण बाद होते” असं प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे आपल्या ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकात म्हणाले आहेत. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी या किल्ल्यावर माँसाहेब जिजाऊ यांच्या पोटी झाला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी युद्धकलेचे धडे दिले, मात्र रेशिमबागेतील संघाणूंनी इतिहास लिहिताना जिजाऊंना बाजूला सारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूपदी नागडा रामदास व चोरटा दादू कोंडदेव बसवून त्यांचा उदोउदो केला. पण हा रामदास एक नंबरचा कामलंपट होता हे तत्कालीन परिस्थितीवरून स्पष्ट होते तर मग ह्या गांजाखस्सला जिजाऊंनी आपल्या स्वराज्यात तरी भटकू दिले असेल का ? असा साधा प्रश्न देखिल या हंगामी शिवभक्तांना पडत नाही तेच लोक आज छत्रपतींच्या विचारांचे खरे मारेकरी आहेत असं म्हटलं तरी काहीच हारकत नाही. कारण अशा निर्बुद्ध हंगामी शिवभक्तांपेक्षा वर्षभर छत्रपती शिवाजी महाराज व बहुजन महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारा शिवभक्त कितीतरी पटीने ग्रेट असून आज त्यांचीच गरज आहे म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“पावसाळ्यात चालणारी
बेंडकुळ्यांची डराव डराव
तसा सिझनेबल भक्त करतो
महाराजांचा जय जय !”

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि कृर्तत्व पाहुन डच इंग्रज फ्रेंच अधिकारी झुकून त्यांना मुजरे घालायचे. मात्र आज तेच छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक साधारण चेष्टेचा विषय या रेशिमबागेतील मनुच्या पिलावळींकडून बनवला जात आहे हे हातभर दाड्या वाढवून अन् वितभर चंद्रकोर लावून फिरणा-या किती शिवभक्तांना माहीत आहे ? मग शिवाजी महाराजाप्रमाणे केवळ दाढी व पेहराव करून खरच शिवाजी महाराज व त्यांचे विचार आत्मसात करता येतात का ? याचाही या हंगामी शिवभक्तांनी विचार केला पाहिजे. पण या भक्तांकडे जय म्हणण्या व्यतिरिक्त अक्कल असते तरी कुठे ? जर यांना अक्कल असती तर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणा-या बाबा पुरंदरे व त्याच्या साथीदारांना पायाखाली तुडवून मोकळे केले नसते का ? समलैंगिक विनायक दामोदर सावरकरला भारतरत्न मिळावा म्हणून रेशिमकीडे वळवळ करतात पण हा बुलबुलवीर सावरकर आपले सहा सोनेरी पाने हे पुस्तक लिहिताना बहुतेक विष्ठेचे गोळे गिळंकृत करून मद्याचे घोट घेत लिहत असावा असेच वाटते. कारण याने जे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लिहल आहे ते वाचून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. पण ह्या हंगामी शिवभक्तांना सावरकाराचे हे काळे कारनामे वाचायला वेळ आहे तरी कुठे ? बापापेक्षा सावरकरला प्रिय मानणारी ही ब्राम्हण जनता पक्षाची पिलावळ सावरकर रामदासाचे देव्हारे मस्तकी उचलताना दिसते. हा हेमल्या विनायक दामोदर छत्रपती शिवाजी महाराजांची थेट बदनामी करतो तरीही आमची येडी पिलावळ सावरकराच्या नावाचे गोडवे गात असेल तर यांनी आपले रक्त एकदा रक्तपेढीत देऊन ते तपासून घ्यायला काय अडचण आहे ? काय सांगता येत या सावरकरवाद्यांच्या रक्तात दिनदयाळ उपाध्याय व शाम प्रसाद मुखर्जीचा डीएनए निघणार नाही कशावरून ?

छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करण्याचा जो घाट या मनुवादी विकृतींनी घातला आहे, त्याला हे हंगामी शिवभक्त बळी पडत आहेत. कारण यांच्या बुद्धीत विचार करण्याची क्षमता आहेत तरी कुठे ? या हास्ताच्या महीन्यात टाईमपास टाईमपासमध्ये निपजलेल्या पिलावळी वाचन करतात तरी कुठे ? बर यांनी वाचन केले तर ते केवळ ‘वामनी विचारांचे बामणी साहीत्य’ वाचून अर्धा हाळकुंडाने पिवळे होतात अन् भटांच्या हातच बाहुल बनून ब्राम्हण जेवढी चावी देईल तेवढंच हे जय जय म्हणण्याच हंगामी काम करतात. म्हणून तर अशा अर्धबुद्धीच्या बावळटांना हाताशी धरुन हे संघाचे विषाणू छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमेपुढे आरती ओवाळून ‘घालीन लोटांगण’ म्हणत स्वतःच स्वत:च्या ढुंगणाला गर्र गर्र फिरवताना दिसतात. अशा या नालायकांना सांगावं वाटतं की, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे चार हाताचे अन् तीन तोंडाचे तेहतीस कोटी देव जे ब्राम्हणी गबाळ असून ते काल्पनिक आहेत मग त्यांच्यापुढे जे आरत्यांचे ते ताट फिरवले जाते तेही बाद होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा देव बनवण्यात काय अर्थ आहे ? ब्राम्हणांनी निर्माण केलेल्या तेहतीस कोटींपेक्षा सरस जर छत्रपती शिवाजी महाराज ठरत असतील तर त्यांच्यापुढे ते धुराडी पेटवलेले आरत्यांचे ताट फिरवण्यात कसला मर्दपणा आहे ? म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“मनुवादी हंगामी भक्त मानतात
आता शिवरायांना विष्णूचा अवतार
उद्या म्हणतील पावला मला देव
झाली माझी बायकू झाली गरवार !”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातृत्वावर जेव्हा जेव्हा या ब्राम्हण व ब्राम्हणवाद्यांनी चिखलफेक केली तेव्हा चळवळीतील कार्यकर्ते सोडता किती जणांनी या विरोधात निर्दषने मोर्चे काढून या घटनेचा विरोध केला होता ? आज जे छत्रपतींच्या नावाने बेगडी प्रेम दाखवत जयघोष करत फिरताना दिसत आहेत, तेच भडवे काल कामलंपट सावरकराच्या समर्थनार्थ मी ही सावरकर म्हणत टोप्या घालून विधान भवणाच्या दारावर वीर सावरकर म्हणत मोठ्याने बोंबलत होते. तोंडी छत्रपतींच नाव तर मनात सावरकर व परशुराम यांना घेऊन फिरणा-यांना आमचे बहुजनांतील भडवे काय म्हणून येवढं डोक्यावर घेऊन मिरवत असतील ? सावरकरांची बदनामी झाली म्हणून राहुल गांधी विरोधात रान पेटवणारे भडवे कोश्यारी या संघाच्या विषाणूने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला तेव्हा त्या रेशिमकीड्यांना काय मोहन भागवतांनी आपल्या मिठीत ओढून घेतले होते का ? कोश्यारींचा साधा निषेध न करणारे हेच होते जे प्रसाद लाड नावाच्या विषाणू बद्दल काहीच बोलत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे कापूर आगरबत्तीचा धूर काढणा-यांना आजपर्यंत सर्वात जास्त छत्रपतींची बदनामी कोणत्या जमातीने केली ? असा प्रश्न विचारल्यास हे हंगामी शिवभक्त उत्तर देतील का ? जर या हंगामी चेल्यांना या प्रश्नांची उत्तरे देता आलीच नाहीत तर त्यांच्या कानाखाली जाळ आणि धूर का काढू नये ? छत्रपती शिवाजी महाराजांकडे उभ्या आयुष्यात वाकड्या नजरेने पहाण्याची कोणाचीही हिंमत झाली नसेल मात्र हे पुरुषांना मिठ्या मारणारे संघाणू दररोज छत्रपती शिवाजी महाराजांवर चिखलफेक करतात तरीही हातभर दाडी अन् वितभर चंद्रकोर लावून फिरणा-या हंगामी शिवभक्तांना थोडीही लाज वाटत नाही. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“सावरकर-पुरंदरे वृत्तीला जर
देत असू आपण साथ
तर समजावा भटांचा डीएनए
घुसला असेल आपल्या रक्तात !”

संविधान लिहिताना मला जास्त त्रास झालाच नाही कारण माझ्या डोळ्यासमोर होते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन त्यांना मावळा या एकत्रिततेच्या सुत्रात बांधून रयतेचे राज्य निर्माण केले होते. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून “चला घेऊ शिव छत्रपतींचा आशिर्वाद अन् मोदींना देऊ साथ” म्हणत रेशिम किड्यांनी इव्हीएममध्ये काड्या करत रेशिमबागेतील मनुच्या नागांनी संसदेला विळखा घालून या देशातील लोकशाहीला सुरूंग लावला. त्यामुळे तर हे राजकीय भडवे ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ म्हणत गुजरात दंगलीत ज्यांचे हात रक्तांनी माखलेत त्यांना अशा उपमा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना कमी दाखवून मोदींचा मोठेपणा दाखवतात, पण हिरा तो हिराच असतो हे रेशामबागेतील मुतखड्यांना थोडीच समजणार आहे. हे संघाणू किडे म्हणजेच हंगामी शिवभक्त आहेत असं म्हटलं तरी काहीच हारकत नाही कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामी वेळी कुठेच निषेध व विरोध करताना आजपर्यंत का दिसले नाहीत. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“भाजीच्या देठाला हात लावू नका
असा आदेश महाराज करतात
आता बाळूमामाच्या मेंढ्या
खुशाल शेतमळ्यात मळ्यात चरतात !”

शेवटी बहुजन समाजाला सांगावं वाटतं की, की शिवजयंतीच्या आदल्या रात्री जागे होऊन आरत्या फिरवणा-या या माकडांकडून शिवसन्मानाची अपेक्षा करणे म्हणजे येड्यांकडून पेढ्यांची अपेक्षा करण्यासारखं आहे. कारण भट ब्राम्हण छत्रपती शिवाजी महाराजांच कार्य कृर्तत्व नाकारण्यासाठी खुप वर्षांपासून खटाटोप करत आहेत, मग ते आज ह्या बहुजनांतील येडपटांना हाताशी धरुन छत्रपती शिवाजी महाराजांच्यापुढे आरत्या ओवाळण्याचे कट कारस्थान व्यवस्थित पार पाडताना दिसत आहेत. पण एकदा का छत्रपती शिवाजी महाराजांचा देव करून त्यांच्यापुढे काकड आरत्या माकड आरत्यांचे ताट फिरून ब्राम्हणी मंत्र उच्चारू लागले तर येणारी पिढी शिवाजी महाराजांनी जे मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या पातीवर स्वराज्य निर्माण केलं ते विसरून जातील हे कोणीही नाकारू शकत नाही. छत्रपतींच्या तेजस्वी कार्याचे खरे मारेकरी हे हंगामी शिवभक्तच असणार आहेत त्यामुळे वेळीच यांना कायद्याने चोप दिला पाहीजे. अन्यथा हे विषाणू सा-या समाजाणाला संक्रमित करून मनुवाद पसरवतील त्यामुळे वेळीच सावध व्हा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!