कामगार संघटनेच्या वतीने सांगली निवारा भवन येथे प्रजासत्ताक दिन साजरा

सांगली :
26 जानेवारी रोजी ठीक सकाळी दहा वाजता आयटक कामगार संघटनेच्या वतीने सांगली निवारा भवन संघटनेच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र आयटकचे उपाध्यक्ष कॉ उदय चौधरी मुंबई यांच्या हस्ते तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. त्यावेळेस खालील प्रमाणे जोरदार घोषणा देण्यात आले इन्कलाब जिंदाबाद!भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो! प्रजासत्ताक दिन जिंदाबाद! शहीद भगतसिंग जिंदाबाद !डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद! धर्मनिरपेक्षता, लोकशाही व समाजवाद जिंदाबाद! हिटलर शाही मुर्दाबाद! फॅसीझम मुर्दाबाद! जातीयवाद मुर्दाबाद! हुकूमशाही मुर्दाबाद! साम्राज्यवाद मुर्दाबाद !
सर्व कामगार एकजुटीचा विजय असो !इत्यादी घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी बोलताना कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्ष 2014 सालापासून सत्तेवर आल्यापासून त्यांच्याकडून दररोज देशाच्या राज्यघटनेची पायमल्ली सुरू आहे. तसेच लोकशाही मूल्यांचा अवमान चालू आहे.भारताचे संविधान प्रजासत्ताक, लोकशाही, समाजवादी व धर्मनिरपेक्षवादी आहे. परंतु भारतीय जनता पक्ष व संघ परिवाराकडून हिंदुत्ववादी इतिहासाचे पुनर्लेखन करून ते भारतीय जनतेवर लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणूनच भाजपच्या प्रतिगामी लोकशाही विरोधी सत्तेचा पराभव करण्यासाठी संघर्ष करून भारताचे संविधान वाचवण्याची आवश्यकता आहे.
जे संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून दिलेले आहे.
याप्रसंगी बोलताना कॉ उदय चौधरी यांनी सांगितले की, देशात सतत हिंदुत्ववादी शक्तींच्या कडून मुस्लिमांच्या विरोधी द्वेष पसरवणे सुरू आहे. तसेच मागासवर्गी यांच्यावरील अत्याचार वाढत चालले आहेत. त्यामुळे या देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झालेला आहे. म्हणूनच देशातील सर्व कामगार वर्ग, धर्मनिरपेक्षवादी शक्ती व कष्टकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांच्यासाठी व मानवी मूल्यांच्या साठी संघर्ष करणे आवश्यक आहे.
यावेळेस निवारा बांधकाम कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी प्राध्यापिका शरयू बडवे,सचिव कॉ विशाल बडवे, पदाधिकारी सलीम इनामदार, सिकंदर शेरेकर, शाबिरा शेरेकर कॉ सुमन पुजारी, सीमा वाघमोडे, कांचन माळी सना मुल्ला कॉ रणजित लोंढे,शांता चवण, उषा तलिकोठी व परवीन मुजावर इत्यादी उपस्थित होते.