
आरोग्य संपन्न समाज निर्मिती झाली तरच दारिद्र्य नष्ट होण्याची सामाजिक क्रांती घडेल चेतनभाई इंगळे
आयुष्य मल्टीपर्पज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे उद्घाटन
कोल्हापूर दि .
आरोग्य संपन्न समाज निर्मिती झाली तरच या देशात दारिद्र्य नष्ट होण्याची सामाजिक क्रांती घडेल असे उद्गगार चेतन भाई इंगळे राष्ट्रीय अध्यक्ष स्वराज्य संविधान रक्षक सेना पॅंथर आर्मी यांनी आयुष मल्टीपर्पज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्यालय उद्घाटन प्रसंगी काढले .
उचगाव तालुका करवीर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक संचालक इरफान हजारी होते.
चेतन इंगळे पुढे म्हणाले आयुर्वेद उपचार पद्धतीचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने नव्याने स्थापन झालेल्या आयुष्य मल्टीपर्पज फाउंडेशन ची निर्मिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवानंद कुंभार यांनी केले आहे .त्यांचा हा आरोग्य विषयक उपक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर देशाला आरोग्य संपन्न बनवेल अशी त्यांनी खात्री व्यक्त केली. ते पुढे म्हणाले समाजामध्ये कुठेही अन्याय अत्याचार व आपल्या हक्काच्या लढाईचा विषय आला तर स्वराज्य संविधान रक्षक सेना पॅंथर आर्मी सामान्यांचा आवाज म्हणून लढेल यासाठी सर्व उपेक्षित वंचित शोषित घटकांनी स्वराज संविधान रक्षक संघटनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले .उपस्थित आयुष्य फाउंडेशनच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांना आरोग्य विषयक जनजागृती चळवळ आपण यशस्वी कराल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमास पॅंथर आर्मी राष्ट्रीय महासचिव संतोष आठवले, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुशील भाई जाधव ,आयुष्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवानंद कुंभार, डॉक्टर राजेंद्र कुमार पवार ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ चंदाताई पाटील, महाराष्ट्र सल्लागार सुरेखा गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष सौ शारदा कोडलकर, पॅंथर आर्मी जिल्हाध्यक्ष एडवोकेट मुकेश अंबेडकर, त्यानंतर आर्मी जिल्हा कार्याध्यक्ष त्र्यंबक दातार प्रशांत कांबळे, ओमकार पाटील, रुकसाना शेख ,निकिता कांबळे .वनिता पवार, काजल सोरटे, प्रवीण सुर्वे, आस्मा मुल्लाणी , किरण गावणकर, रिजवान खतीब यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता शहा यांनी केले स्वागत व प्रास्ताविक अभिनंदन कांबळे यांनी तर आभार तेजस जंगम यांनी मांडले