गंगाराम कांबळे क्रांतीस्तंभ ; पार्किंग हटवा, संरक्षक कुंपण निर्माण करावे या मागणीसाठी पॅंथर आर्मी उग्र आंदोलन करणार – चेतनभाई इंगळे यांचा इशारा

. कोल्हापूर : स्वराज्य संविधान रक्षक सेना पॅंथर आर्मी च्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकराजा शाहू महाराजांनी 1916 गंगारामजी कांबले या दलितास या ठिकाणी सत्य सुधारक हॉटेल सुरू करून दिले शाहू महाराज स्वतः इथे चहापान घेत महाराष्ट्रातील सामाजिक क्रांती परिवर्तनाची ज्योत तेथेच प्रज्वलित झाली त्या ऐतिहासिक स्मारकाला कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासन दुर्लक्ष करत आहे हे लक्षात येताच स्वराज्य संविधान रक्षक सेना पँथर आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष चेतन भाई इंगळे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुशील भाई जाधव राष्ट्रीय महासचिव संतोषजी आठवले या क्रांती स्तंभाला भेट देऊन तिथली पाहणी केली या कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने अशा प्रकारे दुर्लक्ष केला आहे . कोल्हापूरच्या महानगरपालिकेला जाहीर मागणी आहे या ठिकाणी इथल्या पार्किंग हाटवावे इथे स्वच्छता ठेवावी चारी बाजूला संरक्षक कुंपण करावे न झाल्यास पॅंथर आर्मीच्या वतीने उग्र आंदोलन होईल यास जबाबदार महानगरपालिका प्रशासन असेल