मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
विद्यार्थ्यांच्या उत्साहात संपन्न

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
विद्यार्थ्यांच्या उत्साहात संपन्न
मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या विभागाच्या मुख्य धोरणास अनुसरुन “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करण्यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात येतात. यावर्षी
मराठी वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने मराठी भाषेतील अभिजात ग्रंथांचा परिचय करुन देण्यासाठी शासन निर्गमित परीपत्रकानुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या शाळेमध्ये करण्यात आले होते.
ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथदिंडी, कथाकथन, काव्यवाचन, मराठी वाचनकट्टा इत्यादी साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले होते.
राज्यातील अमराठी भाषकांना मराठी भाषेचा सुलभ पध्दतीने परिचय करून देण्याच्या दृष्टीने कार्यशाळा/भाषेसंबंधी स्पर्धांचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोविंदराजन श्रीनिवासन यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषेचे वरीष्ठ शिक्षक जितेन्द्र महाजनसर, मिनल परेरा, तृप्ती परदेशी, संजिवनी नारकर यांनी केले होते.
मराठी सांस्कृतिक कार्यक्रमात मंगळागौर नृत्य व मनस्वी कुंटे या विद्यार्थिनिने केलेल्या एकपात्री प्रयोगाने उपस्थितांची मने जिंकली. मराठी खाद्य संस्कृती मध्ये उकडीचे मोदक, पुरणपोळी, झुणका भाकर, कांदेपोहे, कांदाभजी, थालीपीठ, कोळी बांधवांचे कोलंबी भात, याच बरोबर वरण भात, कोकणी पध्दतीतील सोलकडी व नारळाच्या वड्या यांनी लज्जत आणली. शाळेच्या परिसरात ज्ञानेश्वर माऊलींच्या गजरात व तुकोबा, एकनाथ महाराजांच्या जयघोषात निघालेल्या दिंडीत सारे वातावरण भक्तीमय होऊन गेले होते.