सांगली जिल्ह्यातील 750 बांधकाम कामगारांचे घर मागणी अर्ज पंधरा दिवसात मंजूर न झाल्यास सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बांधकाम कामगार पंधरा दिवसानंतर बेमुदत उपोषण करणार!

.
सांगली जिल्ह्यातील 750 बांधकाम कामगारांचे घर मागणी अर्ज पंधरा दिवसात मंजूर न झाल्यास सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बांधकाम कामगार पंधरा दिवसानंतर बेमुदत उपोषण करणार!
फक्त सांगली जिल्ह्यामध्ये साडेसातशे पेक्षा जास्त घरकुलाचे अर्थसहाय्य मिळण्यासाठी मागील आठ महिन्यापासून 750 अर्ज केलेले आहेत. यातील मागील आठ महिन्यांमध्ये फक्त 151 अर्ज तपासलेले आहेत. म्हणूनच घरकुलासाठी केलेल्या अर्जदार कामगारांनी तारीख 23 जानेवारी 2023 रोजी घरकुल मागणीसाठी अर्ज केलेल्या कामगारांनी सांगली सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्या अर्जाची त्वरित तपासणी करावी अशी मागणी त्या वेळेस 300 पेक्षा जास्त कामगारांनी प्रत्यक्ष सहाय्यक कामगार आयुक्त श्री अनिल गुरव यांच्याकडे केली. याबाबत सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त यांनी असे लेखी आश्वासन दिलेले आहे की, 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत सर्व घरांच्या साठी अर्ज केलेले आहेत ते तपासून मंजूर करुन निकाली काढण्यात येतील. तसेच त्यांनी असेही सांगितले आहे की ग्रामीण भागातील घरकुलासाठी केलेले सव्वीस अर्ज मंजूर करण्यात आलेले असून त्यांना लवकरच अनुदान मिळेल. त्याचप्रमाणे मिरज भीमपलास प्रकलप श्री गोखले बिल्डर यांच्या प्रकल्पातील 30 फ्लॅट्स बांधकाम कामगारांना मिळाले आहेत. अद्याप साठ बांधकाम कामगारांना अनुदान थोड्याच दिवसात मिळेल असेही त्यांनी सांगितले.
दुसऱ्या बाजूस कामगार मंत्री श्री सुरेशभाऊ खाडे हे सांगत आहेत की सांगली जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत 66 हजार बांधकाम कामगारांना आम्ही घरकुल देणार आहोत. परंतु अशी घोषणा होऊन सहा महिने झाल्यानंतरही त्याबाबतची काहीही कारवाई अद्याप सुरू झालेली नाही उदाहरणार्थ सांगली सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये 750 अर्ज घरकुलासाठी दाखल झालेले आहेत त्यातील फक्त 26 बांधकाम कामगार यांच्या बाबत निर्णय झालेला आहे. बाकीचे राहिलेले 700 पेक्षा जास्त अर्जांच्याबाबत सात महिने होऊन गेले तरी काही एक कारवाई झालेली नाही. म्हणुनच हे अर्ज ताबडतोब तपासणी करणे आवश्यक आहे.
तारीख 9 9 /2014 रोजी महाराष्ट्र शासनाने असा जीआर काढलेला आहे की, एक महिन्यात बांधकाम कामगार विषयक सर्व प्रकारचे अर्ज निकाली काढावेत सदर जीआर सोबत जोडलेली आहे.
सध्या सांगली साहेब कामगार आयुक्त कार्यालयामध्ये घर मागणी अर्ज 550 अजूनही तपासलेले नाहीत ते सर्व अर्ज त्वरित तपासून या सर्व अर्जांच्या संदर्भामध्ये उप कामगार आयुक्त पुणे, प्रकल्पाधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांची सत्वर बैठक घेऊन वरील प्रमाणे निर्णय करावा.
कारण ह्या तीन अधिकाऱ्यांची कमिटी जोपर्यंत घरकुल अर्ज मंजूर करत नाहीत तोपर्यंत कामगारांना घरकुलाचे अनुदान मिळणार नाहीत. म्हणूनच या संदर्भातली बैठक त्वरित घ्यावी.
अन्यथा पंधरा दिवसानंतर बांधकाम कामगारांना सांगली जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषण करावे लागणार आहे याबाबतची तयारी करण्यासाठी 31 जानेवारी रोजी ठीक सकाळी 11 वाजता सांगली निवारा भवन येथे बांधकाम कामगारांच शिबीर आयोजित करण्यात आलेला आहे. त्या शिबिरास बांधकाम कामगारनी उपस्थित राहावे. असे आवाहन करणारे पत्रक निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या जनरल सेक्रेटरी प्राध्यापिका शरयू बडवे यांनी प्रसिद्धीस दिलेल आहे.