विशेष लेख

बुवाबाजी ही सामाजिक कीड आहे !

बुवाबाजी ही सामाजिक कीड आहे !

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
repe9nat@gmail.com

“अंगावर घेती आध्यात्माची शाल। रंगवती भाल चंदनाने ॥१॥
भगव्याच्या आत पुर्ण हे नागवे। जगा ठगवावे धर्म यांचा ॥२॥
जटा वाढवीत लंगोटी घालती। समाधी लावती पापण्यांची॥३॥
म्हणे विश्वंभर वरलीया खुणा। दिसताची जाणा दांभिक हे॥४॥”

हा अभंग विद्रोही कवी विश्वंभर वराट यांनी लिहिलेला असून हा वाचल्यास आठवण आली ती कामलंपट आसाराम राम रहीम या जंतांची. कारण यांनी आधात्माच सोंग आणि ढोंग करून लोकांच्या बुद्धीवर तर दरोडा टाकलाच पण महिलांच्या शरीरावर ही हात घातला, तरीही या बाबाने पोसलेले गुंड, रखेल आणि रंगेल भक्तीनी ? यांच्यासमोर आसाराच्या विघ्नसंतोषी कार्याचा पाढा वाचण्याचा प्रयत्न कोणी जर केलाच तर आसाराम नव्हे पण या भक्तांच्या पृष्ठभागात जाळ होतो त्यामुळे त्या पिसाळल्यागत करतात हे नवलच म्हणावे लागेल. आसाराम सारख्या अनेक बुवा आणि बाबांचा फेस सध्या देशभर आला असून तेवढ्याच जोमाने त्यांच्या भक्त संख्येतही डुकरीणीच्या पिलावळीप्रमाणे वाढ होत आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

नागपुरातील रेशिमबाग येथे सुरू असलेल्या दिव्यशक्ती प्रात ?बागेश्वर धामच्या कथा व दर्शन सोहळ्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव म्हणाले की, ‘दैवी दरबार’ आणि ‘भूत न्यायालय’च्या नावाखाली जादूटोण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. यासोबतच देव-धर्माच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट, फसवणूक, पिळवणूक केली जात आहे. महाराजांवर कारवाई करावी. कथेच्या नावाखाली जे काही चालले आहे ते जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरवणारे कृत्य आहे, आणि वारंवार अशी मागणीही समितीने पोलिसांकडे केली असून याबाबत दोन वेळा पोलीस आयुक्तांकडे आणि नंतर नागपूर गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली. (मुंबई तक ११ जाने. २०२३) ‘दैवी दरबार’ व ‘भुत न्यायालया’ च्या नावाखाली लोकांच्या मस्तकाची माती करणारे बागेश्वरधाम सारख्या लंफग्यांना धरून त्यांच्या पृष्ठभागावर पायतानाचे फटके द्यायले पाहीजेत. पण यांनी जी भक्तांची पिलावळ तयार किंवा निर्माण केलेली असते ती फार विचित्र असते. बुवा बाबा आम्मा अम्मीच्या नादी लागून आमच्या बहुजन सामाजाची आणि त्यांच्या मस्तकाची माती केव्हा झाली हे त्यांनाही समजत नाही. एकदा का हे बुवा बाबांच्या नादी लागले की, आमचे बाबा लय ग्रेट म्हणू़न त्याचे हागताना व उठताना देव्हारे माजवतात. बुवा बाबांना अथवा स्वामींना मानणा-या भक्तांच्या घरात प्रवेश केल्यास त्यांच्या घरातील भितींला टांगलेले बाबांचे उघडेबंब फोटो पाहून हसू येत व भक्तांच्या बुद्धीची किव. कारण घरातला शहाणा किंवा कर्ता पुरूष आजही आपल्या घरातील महीलेसमोर अंतर्वस्त्रावर घरात वावरताना दिसत नाही कारण त्याला शरम वाटत असते. मात्र भिंतींवर टांगलेल्या बांबाचे लंगोटीवर असलेले उघडेबंब फोटो बघून त्या घरातील महीलांना व घरात टाॅवेल गु़डाळून फिरणा-या त्या भक्ताला काहीच का वाटत नाही ? या भक्तांचा जर मेंदू शिल्लक असेल तर त्यांनी आधी त्या लंगोटीवाल्या बुवा बाबांच्या फोटोला काडी लावली पाहीजे पण गुलाम भक्तांच्यात तेवढी धमक ती काय ? म्हणून तर प्रा.य.ना.वालावलकर म्हणतात, आपली बुद्धी बुवा बाबाच्या चरणी एकदा का गहाण ठेवली की, मग गुलामीतून सुटका नाही.” तसेच विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“ऐसा गुणी बुवा खेळुनीया होळी। राधिकेची चोळी भिजवितो॥१॥
सात दिस त्याने केली रामकथा। समाप्तीला सिता पळवीली॥२॥
ऐसे महाराज रंगात मुरले। वस्त्रही चोरले गौळणीचे॥३॥
म्हणे विश्वंभर त्याशी जड विणा। हात सोडवेना फुगडीचा ॥४॥”

बुवा बाबा यांचे स्तोम आज एवढे माजले आहे की, जशी डुकरीणीच्या पिलांळींची पैदाईश होत आहे तशीच ही बुवा बाबा आम्मा आमी व भक्तांची पैदाईश होत आहे. एकदा का नवीन बुवा मार्केटला आला की त्यांचे भक्त त्यांच्या दिव्यशक्तीचा प्रचार प्रसार करून त्याला एवढे डोक्यावर घेतात की विचारताच सोय नाही. डोळे झाकून दुध पिणा-या मांजरीप्रमाणे वर्तन करणा-या भक्तांनी त्या बुवा बाबाची दिव्यशक्ती व चमत्कार स्विकारले म्हणजे सर्वच लोक त्या बुवा बाबाला डोक्यावर घेतीलच असे नाही. काही बुद्धीप्रामाण्यवादी लोक त्या बाबाच्या दिव्यशक्ती व चमत्कार आव्हान देऊन त्याला पळता भुई थोडी करून सोडतात तेव्हा त्या बाबाचा ढोंगीपणा सिध्द व्हायला वेळ लागत नाही. त्याच झालं असं की, नागपूरच्या रेशीमबागमध्ये बागेश्वरधामची कथा ऐकण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी लोक दूर-दूरवरून पोहोचत होते. यात सर्वाधिक गर्दी मध्यप्रदेशातून आलेल्या लोकांची आहे. या कथेतून अंधश्रद्धा पसरविण्याचे हा बागेश्वरधाम करतो असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने करून पोलिसात दाखल केली. (मुंबई तक ११ जाने. २०२३) मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चमत्कार सिद्ध करून दाखवण्याचे दिलेले आव्हान पाहून बागेश्वर धाम या भोंदूने अशी काही धूम ठोकली की विचारताच सोय नाही. कारण बागेश्वरधामची कथा व दर्शन सोहळा हा ५ जानेवारीला नागपुरातील रेशीमबाग मैदानात सुरू झाला होता आणि तो १३ जानेवारीला संपणार होता. पण या कथेचा शेवटचा हा ११ जानेवारीलाच करावा लागला. (मुंबई तक ११ जाने. २०२३) अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हटलं की अनेकांचा लंगोट पिवळा होतो त्यात बागेश्वर धामचा झालेला पिवळा लंगोट रेशिम किड्यांनी पाहीलाच असेल. दिव्यशक्तीचे प्रयोग करून दाखवणारा लफंगा दोन दिवस आधीच रेशिमबाग सोडून फरार का झाला ? अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केवळ दिव्य शक्तीचा प्रयोग करून दाखवण्याचे आव्हान न स्विकारता पसार होणारा हा बागेश्वर धाम म्हणावा की फरारेश्वर धाम ?

महादेवशास्त्री दिवेकर हे आॅगस्ट १९३४ च्या किर्लोस्कर या अंकात म्हणतात की, “बुवाबाजी ही सामाजिक कीड आहे.” पण या किडीतून निपजलेल्या बागेश्वर धाम सारख्या विकृती हनुमानाची कृपा असल्याचे सांगत मला सिद्धी प्राप्त झाली असून मला लोकांच्या मनातील ओळखता येत अस सांगतो. त्यामुळे बागेश्वर धामच्या पायावर मस्तक ठेवणा-या व त्या किडीला पोसण्यासाठी मदत करणा-या विकृती आम्हीच संसदेत व विधानसभेत पाठवल्या आहेत ही खुप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. कारण बुवा बाबा व बागेश्वर धामच्या यादीत समाविष्ट असलेल्या लोकांनी नाव पाहिल्यास स्वतःला लाज वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण याच्या पायावर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, मनोज तिवारी, देवेंद्र फडणवीस व अभिनेते अमिताभ बच्चन, सुमन तलवार यांच्यासारखे लोक लोटांगण घेऊन पालथे पडतात तेव्हा यांच्या अकलेवर प्रश्न निर्माण होतात. https://youtu.be/AAs2NLnkAqA दिव्यशक्ती प्राप्त असणा-या बागेश्वर धाम या पळपुट्याला जर लोकांच्या मनातील सर्वच कळत तर मग नरेंद्र मोदींची पत्नी जोशीदाबेन यांच्या मनाची तळमळ का कळत नाही ? मोदींनी बायकोला वा-यावर सोडून लोकांचे संसार चव्हाट्यावर आणण्याचा विडा उचलला आहे हे का बागेश्वरला समजत नाही ? अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जे आव्हान दिलं न स्विकारता पृष्ठभागाला पाय लावून पसार होणारा बागेश्वर नावाचा लंफगा हा लंग्नमडपातून पसार होणा-या ‘रांड’दास व जहाजच्या शौच्छपकुपातून पसार होणा-या विनायक सावरकराच्या गोत्रातील असल्यामुळेच त्याने रेशिमबागेतून पळ काढला असावा ? कारण कामलंपट पेशवे देखिल रंणागण सोडून पळाले होते त्यांचेच हे नवीन व्हर्जन म्हटलं तर आमचं चुकत कुठे ? कारण बागेश्वर धाम महाराज जसा पृष्ठभागाला पाय लावून नागपूरातून पसार झाला तसाच रामदास नावाचा गोसावडा मंडपातून व सावरकर नावाचा गंडवा जहाजातून पसार झाला होता. बागेश्वर धाम सारख्या लफंग्यांसाठी व इतर दैवी शक्ती प्राप्त असल्याचे ढोंग करणा-या चोरांसाठी जागतीक स्तरावर जादुगार जेम्स रॅडी यांचे दहा लाख अमेरिकन डॉलरचे बक्षीस जाहीर आहे. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ३० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे, हे भक्तांना का समजत नसेल ? म्हणून तर डाॅ. अब्राहम कोवूर म्हणतात की, “जो व्यक्ती आपली दैवी शक्ती तपासू देत नाही तो लबाड, ढोंगी आपल्या आध्यात्मिक गुरुची दैवी शक्ती तपासण्याचे ज्याला धैर्य नसते तो भोळसट श्रद्धाळू आणि कसोटी न पाहता जो श्रद्धा ठेवतो तो मुर्ख.” म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“सांगतो बुवाला झाली प्राप्त सिध्दी। तुला प्राप्त बुध्दी केशी नाही॥१॥
त्याने सिध्दीनेच कोठार भरावे। दान का मागावे जगाकडे॥२॥
बाबाने का येथे भक्तीणी भोगाव्या। रंभा हेपलाव्या सिध्दीद्वारे ॥३॥
सिधीवाल्या बुवा दे रे यांना बुध्दी। लागूनये नादी कधी तुझ्या ॥४॥”

डाॅ. अब्राहम कोवूर हे श्रीलंकेतील सुप्रसिद्ध बुद्धिप्रामाण्यवादी होते, ‘त्यांनी पन्नास वर्षांपूर्वी जगातील सर्व बुवा, बाबांना आव्हान दिले होते की, चमत्कार करून दाखवा. दैवी शक्ती सिद्ध करा, एक लाख रुपये बक्षीस मिळवा ! प्रवेश फी एक हजार रूपये‌.’ त्यांनी हे आव्हान व अटी जगभरातील वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्या होत्या. “कोणीही बुवा आव्हान स्वीकारायला पुढे आला नाही. दोन भक्तांनी आपले स्वामी सहज बक्षीस जिंकतील असे वाटून हजार हजार रूपये प्रवेश फी भरली.” पन्नास वर्षांपूर्वी
डाॅ. अब्राहम कोवूर यांनी जे पन्नास वर्षांपूर्वी एक लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते त्याची आजची किंमत किती असेल ? ते आव्हानही बागेश्वर धाम स्विकारल का ? आजपर्यंत कोणताच बाबा हे आव्हान स्वीकारू शकला नाही. कारण बक्षिस देणारा बाबाला भोंगळ केल्याशिवाय सोडणार नाही याची प्रचिती दिवीशक्ती प्राप्त बाबाला आली असेल असंच म्हणावं का ? नागपुरातून दिव्यशक्ती चा दावा करणारा बागेश्वरधाम याला अंनिसने पळवून लावले कारण दिव्य शक्ती सिद्ध करुन दाखवल्यास ३० लाखाचे बक्षीस देऊ असे चॅलेंज अंनिसने जाहीर केले होते, पण तुरुंगवास होईल या भितीने बागेश्वर धामने पळ काढल्याची घटना रेशिमबागेत घडली. जादूटोणा विरोधी कायद्यात जामिनाचीही तरतूद नाही. यांची जाणीव संयोजकांना झाल्यामुळे त्यांचा लंगोट पिवळा झाला की काय ? त्यामुळेच तर कथेचे संयोजक व आयोजक म्हणाले की, ‘ही कथा ५ जानेवारी ते ११ जानेवारी असे ७ दिवस चालणार होती. परंतु आम्ही आयोजकांनी धीरेंद्र शास्त्री महाराजांना विनंती केली त्यानंतर हा कार्यक्रम १३ जानेवारीपर्यंत करण्यात आला होता. पण ही कथा २ दिवस आधीच संपवली जात आहे.’ (मुंबई तक ११ जाने. २३) विषेश म्हणजे या अंधश्रद्धेला खतपाणी घालणा-या नागपुरातील रेशमबाग मैदानात सुरू असलेल्या बागेश्वर महाराजांच्या रामकथेत दर्शन घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार आणि बडे नेते आले होते. (मुंबई तक ११ जाने २३) पळकुट्या रामदास सावरकरांचे समर्थक हेच बुवाबाजीला खतपाणी घालतात हे वारंवार सिद्ध झालेले आहे. म्हणून तर डाॅ. बालाजी जाधव म्हणतात की, “उत्तर भारतीय कथाकारांचे महाराष्ट्रातील वाढते प्रस्थ वारकरी धर्माची आणि महाराष्ट्र संस्कृतीची माती केल्याशिवाय राहणार नाही.” तसेच विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“बांधुनीया मठ संत झाले शेठ। संपत्ती अफाट साठवूनी ॥१॥
नेसुनी सोवळे भगवे पिवळे। कापतात गळे भाविकांचे॥२॥
कथा प्रवचन योगयाग ध्यान। भजन पुजन रात्रंदिन ॥३॥
भक्तीच्या घाण्याला जुंपलेले रेडे। म्हणे भक्त वेडे विश्वंभर ॥४॥”

आमच्या घरातील अन्न धान्याला जर किड लागली तर ती नष्ट करण्याच सामर्थ्य आमच्या बहुजनात आहे मग बुवाबाजीची जी सामाजिक कीड आहे तीला हा बहुजन समाज नष्ट का करू शकत नसेल ? पत्रकारांच्या खांदानाची संपुर्ण माहीती सांगणा-या बागेश्वर या पाखंडी बाबाने आपल्या दिव्य शक्तीने पुलवामा येथे घडलेल्या घटनेत आरडीएक्स कुठून आले या एकाच प्रश्नाचे उत्तर द्यावे असा प्रश्न सपा नेते राजीव राय यांनी विचारला आहे. या प्रश्नांचे उत्तर हा बागेश्वर देणार का ? झाडाला लागलेली कीड जशी किटकनाशकाची धुराळणी करून नष्ट केली जाते ती ही बुवाबाजी ची सामाजिक किड नष्ट करण्यासाठी महापुरुषांच्या विचारांची व विज्ञानवादाची वैचारिक धुराळणी आपल्या मन आणि मस्तकावर करा अन्यथा भक्तांनो आता फक्त बागेश्वर धामचा आसाराम प्रमाणे भोगेश्वर धाम बघायचा बाकी आहे त्यामुळे आपापल्या बायका पोरी सांभाळा नाहीतर त्यांचे समर्थन करता करता केव्हा तुमच्या मोबाईलवर बागेश्वरचा भोगेश्वर झाला हे पत्ताही लागणार नाही. त्यामुळे, वेळीच सावध व्हा कारण अजूनही वेळ गेली नाही. म्हणून तर शेवटी विद्रोही कवी विश्वंभर यांच्याच शब्दांत सांगावं वाटतं की,
“श्री श्री श्री श्री श्री श्री वाढवी शेपूट। आज स्त्रीलंपट ऐसे कीती ॥१॥
जो पडे उघडा होतो त्याचा घात। परी तो महंत झाकलेला ॥२॥
लोकां ठगवूनी होती कोट्याधीश। राजाश्रय त्यास पोसवीतो ॥३॥
म्हणे विश्वंभर काय देती ज्ञान। बुध्दीमधे शेण भरलेले ॥४॥”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!