Uncategorized

राम बेडजवळगे बसवण्णांच्या विचारांचे खरे पाईक

राम बेडजवळगे बसवण्णांच्या विचारांचे खरे पाईक

मी लिहलेल्या “डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !” या पुस्तकात मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा ही भूमिका बजावणारे माझे मित्र असा ज्यांचा उल्लेख केला त्या राम बेडजवळगे सरांचा आज वाढदिवस…. त्यामुळे त्यांना माझ्या कडून व रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड) कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

आम्हीही घडलो तुम्हीही घडाना हे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे वाक्य मी मन आणि मस्तकात घेउन या ब्राम्हणी व्यवस्थेवर लेखणीने आसूड ओढत असतो‌. पण केवळ आसूड ओढूनच चालणार नाहीत तर आपल्या आसपासची व आपल्या संपर्कातील व्यक्ती व मित्र ही बुध्द शिव फुले शाहु आंबेडकर अण्णाभाऊ व बसवण्णा यांच्या विचारांची घडली पाहीजेत. कारण ही विचारांनी घडलेली माणसे आपली व आपल्या बहुजन समाजाची ढाल बनून ते लोक जागृतीचे काम करण्यासाठी तयार होतात.

आम्हीही घडलो तुम्हीही घडाना ही युक्ती जेव्हा २०१६ साली मी माझे मित्र राम बेडजवळगे सरांना सांगितली व हिंदू – हिंदुत्व, मंदीर – मस्जिद, भगवा – हिरवा – निळा, यावर चर्चा केली तेव्हा त्यांच एकच मत होतं की, हिंदू जगला पाहीजे, हिंदू धर्म धोक्यात आहे, हिरवा बोकाळला आहे, हिंदूंच्या पोरींना मुस्लिमांची पोरं फूस लावून लव्ह जिहाद करत आहेत, गाय ही आपली माता आहे मुस्लिम तीची हत्या करतात, देशात समान नागरी कायदा आला पाहीजे, आरक्षण संपवलं पाहीजे, हिंदूंची अस्मिता म्हणजे अयोध्येत राम मंदीर ते झालं पाहीजे असे असंख्य प्रश्न त्यांनी माझ्यापुढे मांडताच मी त्यांना जेव्हा एका एका प्रश्नांची उत्तरे केवळ वैचारिक भाषेत देत होतो, तेव्हा राम सरांना हे पटतच नव्हतं कारण त्यांच्या मन आणि मस्तकावर ताबा होता तो ब्राम्हणी विचारांचा व रेशिम बागेतील किड्यांचा.
पण मी ही त्याच मुशीत घडलो होतो जी मराठा सेवा संघाची मुस रेशिमबागेला धोबीपछाड करत लोकांच्या मस्तकातील जातीय धर्मांधतेची घाण काढून टाकण्यात यशस्वी झाली आहे. मग सरांनाच प्रश्न विचारायचे की हो सर राम मंदीर झालं पाहीजे पण त्यात बहुजनातील किती तरुणांना पुजारी म्हणून नौकरी लागणार आहे ? या प्रश्नांच उत्तर त्यांच्याकडे नव्हतेच तर ते देणार तरी कुठूण ? हिंदू धर्म धोक्यात आहे, तो आपणच वाचवण्यासाठी काठ्या लाठ्या दगड धोंडे हातात घेऊन दंगली करायच्या म्हटल्यास मग भगवतगीतेत जो श्रीकृष्णाने अर्जूनाला सांगितले की, जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल किंवा धर्म संकटात असेल तेव्हा तेव्हा मी येईल हे खोटंच म्हणायचं का ? या प्रश्नाच उत्तरही त्यांचेकडे नव्हते. मंदीर बांधल्यास कोणाच्या पोटापाण्याचे प्रश्न मिटणार आहेत ? अयोध्येतील मंदीरामुळे जर शेतकरी सुशिक्षित बेरोजगार व महीला मुलींचे प्रश्न मार्गी लागणारच असतील तर अयोध्येत मंदीर झाले पाहीजे पण वरील प्रश्नांचे काय ? असं विचारताच सर विचार करू लागले. तेव्हा मला समजलं की, जो व्यक्ती विचार करू लागतो तो व्यक्ती नक्की स्वतः मध्ये परिवर्तन घडवू शकतो. कारण माणसाला पडलेले प्रश्न त्यामध्ये परिवर्तन करण्यास भाग पडतात.

लव्ह जिहाद म्हणजे काय ? मुस्लिम मुलाने हिंदूंच्या मुलीसोबत लग्न केलं तर लव्ह जिहाद ठरू शकतो. तर मग मुस्लिम मुलीने हिंदू मुलांसोबत प्रेम करून लग्न केलं त्याला कोणता जिहाद म्हणायचे ? भाजप शिवसेना व आरएसएसचे बडे बडे दलाल आहेत त्यांच्या मुलींचे नवरे मुस्लिम आहेत त्यांचे काय ? त्यांना जर मुस्लिम जावई चालतच असेल तर बाकीच्यांना काय टोचतो का ? ज्यांचे नातेवाईक मुस्लिम आहेत त्यांनी लव्ह जिहाद वर बोलणे व त्या लोकांचे बहुजनातील तरूणांनी ऐकणे हे तरी योग्य वाटते का ? गोमाता ही शेतक-यांसाठी प्रियच आहे त्यामुळे एकही शेतकरी खाटकाला गाय देत नाही पण ज्यांच्या घरी गाय नाही, जे गायीचे शेण काढत नाहीत, ज्यांनी कधी गायीला चारा टाकला नाही मात्र ते कधीच दही दूध व तुपाशिवाय जेवण करत नाहीत त्यांच्याकडून गाय गोमाता आहे हे ऐकण तरी बरोबर वाटत का ? जे लोक गोमाता गोमाता म्हणून तत्वज्ञान हेपलतात त्या लोकांच्या बापजाद्यांनी गायीचा पृष्ठभाग देखिल खायचा सोडला नाही याचे असंख्य पुरावे रामायण महाभारत या ग्रंथात सापडतात. आताही देशात ज्या गोमांस निर्यात कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे मालक कोण आहेत ? याही प्रश्नाच उत्तर सरांकडे नव्हते.

समान नागरी कायदा झालाच पाहीजे पण आजपर्यंत ज्यांनी लोकांच्या डोक्यात धूळ फेकून मंदीरातील दानपेठीवर हक्क गाजवत शंभर टक्के आरक्षण मारलं त्याच काय ? उद्या जर समान नागरी कायदा लागू झालाच तर देशातील मंदीरात पुजारी पदावर एखादा लिंगायत, मराठा, तेली, नाव्ही समाजातील पुरूषाला समान नागरी कायद्यातर्गत नौकरी मिळेल का ? सरांच्या प्रश्नांना मी जसे जमतील तसे उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले मात्र त्यांनी मी विचारलेल्या एकाही प्रश्नांचे उत्तर दिले नाही मात्र त्यांनी तेव्हा एका एका प्रश्नावर विचार केला आणि उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यासमोर धर्माच्या ठेकेदारांच्या जो चेहरा उघडा पडला तो त्यांना समजला ही खुप मोठी गोष्ट आहे.

माणसाला बदलू शकतात तेहकेवळ पुस्तक त्यातील विचार आणि मनात पडलेले प्रश्न. याच उत्तम उदाहरण म्हणजे आमचे मित्र राम बेडजवळगे. सांगायचं एवढंच की, २०१६ साली कट्टर हिंदुत्ववादी असलेले माझे मित्र आज २०२४ साली शंभर टक्के पुरोगामी विचारांचे म्हणजेच बुद्ध शिव फुले शाहु आंबेडकर अण्णाभाऊ बसवण्णा यांच्या विचारांचे आहे प्रचारक प्रसारक आहेत. ही मराठा सेवा संघाने केलेली वैचारिक क्रांती आहे असं म्हटलं तरी काहीच वावगं ठरणार नाही.

राम सर तुम्ही नक्कीच तुमच्या मित्र परिवारीतील माणसांनी डोकी ठिकाणावर आणून आम्हीही घडलो तुम्हीही घडाना हा संदेश त्यांच्यासमोर मांडाल हीच तुमच्या वाढदिवसाच्या दिनी अपेक्षा ठेवतो….! तुम्हाला परत एकदा तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शिवशुभेच्छा….!

जय जिजाऊ जय शिवराय जय बसवण्णा

शुभेच्छूक….
रेपे नवनाथ दत्तात्रय
प्रकाशक – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
लेखक –
१. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
२. भट बोकड मोठा
३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!