महाराष्ट्र सरकारच्या विरोधात ५० हजार कामगारांचे नागपूर विधानसभेवर आयटक लाल झेंड्याच्या नेतृत्वाखाली अफाट शक्तिप्रदर्शन

आयटक संलग्न असलेल्या संघटनांचा नागपूर विधानसभेवर शिंदे व फडणवीस सरकारच्या विरोधात सकाळी १२.०० वाजता नेहरू गार्डन शुक्रवारी तलाव नागपूर येथून प्रचंड मोर्चा काढण्यात आला!
५० हजार कामगार व कष्टकऱ्याच्या मोर्चाने नागपूर शहर दणाणले.
अंगणवाडी,बालवाडी,आशा,शालेय पोषण आहार,ग्रामपंचायत कर्मचारी, बांधकाम कामगार, कोळसा व वीज उद्योगातील कर्मचारी इत्यादि आयटकला संलग्न संघटनाचा मोर्चामध्ये सहभाग होता.. मोर्चा विधान भवनवर अडविण्यात आल्यानंतर प्रचंड मोठी जाहीर सभा झाली. या जाहीर सभेला ऑल इंडिया ट्रेडिंग युनियन काँग्रेसचे नेते कॉम्रेड सुकुमार दामले, कॉ मोहन शर्मा, कॉ श्याम काळे, कॉ शंकर पुजारी, कॉ दिलीप ऊटाणे, कॉ राजू देसले, कॉ माधुरी क्षीरसागर, कॉ नामदेव चव्हाण, कॉ तानाजी ठोंबरे, कॉ कृष्णा भोयर,कॉमेड जोसेफ,कॉम्रेड प्रकाश बनसोडे इत्यादी आयटक नेत्यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तक महिला व अंगणवाडी महिलांना दरमहा 26 हजार रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे. दिवाळीच्या वेळेस राहिलेली भाऊबीज रक्कम त्वरित मिळाली पाहिजे अशी जोरदार मागणी शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत कामगारांना सुद्धा मागील फरकसहित घोषित किमान वेतन मिळायला पाहिजे. तसेच इतर विभागातील कामगारांच्या मागण्या मांडण्यात आल्या.
इतकेच नव्हे तर दिलेल्या आश्वासनाच्या निर्णयासाठी व अंमलबजावणीसाठी लवकरच मुख्यमंत्री, संभधित मंत्री व आयटक कामगार संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी संयुक्त बैठक घेण्यात येईल. असे शिष्टमंडळास मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले.
शिष्ट मंडळामध्ये आयटक कामगार संघटनेचे नेते कॉ मोहन शर्मा, कॉ शाम काळे, कॉ शंकर पुजारी, कॉ माधुरी क्षीरसागर, कॉ राजू देसले व कॉम्रेड नामदेव चव्हाण यांचा समावेश होता.
मुख्यमंत्र्यांच्या बरोबर शिष्टमंडळाची चर्चा झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता झालेल्या समारोपाच्या सभेसाठी सुद्धा 50000 पेक्षा जास्त कामगार कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. मोर्चा समारोपाच्या सभेमध्ये बोलताना महाराष्ट्राचे आयटकचे जनरल सेक्रेटरी कॉ शाम काळे यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार अंमलबजावणी न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्मचारी कामगार जोरदार तीव्र आंदोलन करतील.त्याची तयारी करावी असेही त्यांनी महाराष्ट्रातील कामगारांना आवाहन केलेले आहे.

