महाराष्ट्र राज्य आयटक कामगार संघटनेचे पदाधिकारी म्हणून निवड झालेल्या नेत्यांचा सांगली निवारा भवन येथे भव्य सत्कार

महाराष्ट्र राज्य आयटक कामगार संघटनेचे पदाधिकारी म्हणून निवड झालेल्या नेत्यांचा सांगली निवारा भवन येथे भव्य सत्कार
22 नोव्हेंबर रोजी सांगली येथे महाराष्ट्र राज्य आयटक कामगार संघटनेचे सचिव म्हणून निवड झालेले कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की, सध्या महाराष्ट्रामध्ये पंधरा लाख बांधकाम कामगारांचे मागील एक वर्षापासून अर्ज प्रलंबित असल्यामुळे संपूर्ण राज्यातील पंधरा लाख बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मिळणाऱ्या लाभांपासून वंचित आहेत. शेकडो विधवा महिलांना महाराष्ट्रमध्ये त्यांच्या नोंदणीकृत बांधकाम कामगार पतीचे निधन होऊन एक वर्ष झाले तरी त्यांना अंत्यविधीची रक्कम सुद्धा अद्याप मिळालेली नाही. अशाप्रकारे महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा अनागोंदी कारभार सुरू आहे. दुसऱ्या बाजूस या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे फक्त कामगारांच्या कल्याणासाठीच वापरण्यासाठी 14 हजार कोटी रुपये उपकरामधून निधी जमा आहे. तरीही या जमलेल्या निधीच्या व्याजाइतकी रक्कम सुद्धा कामगारांना दिली जात नाही.
बांधकाम कामगारांच्या घरबांधणीची योजना प्रत्यक्षात सुरू करण्याच्या ऐवजी फक्त महाराष्ट्र शासन घोषणा देत आहे. परंतु प्रत्यक्षात बांधकाम कामगारांना घरकुल देण्याबाबत कसलीही कारवाई सुरू नाही. म्हणूनच या सर्व अन्यायविरुद्ध आणि तातडीने कामे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या बजेट अधिवेशनामध्ये मुंबई आझाद मैदान मध्ये महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचे बेमुदत उपोषण करण्यात येईल. असे कॉ शंकर पुजारी यांनी सत्कार कामगार सभेमध्ये स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य आयटक बांधकाम कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी महाराष्ट्रातील आशा व गट प्रवर्तक महिलांच्या नेत्या कॉ सुमन पुजारी यांची निवड झालेली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या आयटक कौन्सिल पदी कॉ शरयू बडवे, कॉ विशाल बडवे, कॉ विद्या भालेकर, कॉ अंजली पाटील, कॉ विद्या भालेकर, कॉ पल्लवी पारकर, कॉ विद्या कांबळे, कॉ रोहिणी कांबळे, कॉ सुनील पाटील, कॉ साबिरा शेरेकेर व इंदुमती येल्मर यांची निवड झाली.
तसेच १६ नोव्हेंबर रोजी सांगली येथील आयटक बांधकाम कामगार राज्य फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी म्हणून कॉ शंकर पुजारी, उपाध्यक्ष कॉ रमेश जाधव, कोषाध्यक्ष कॉ उदय चौधरी, बांधकाम कौन्सिल सदस्य म्हणून कॉ विजया शिंदे, कॉ सलीम इनामदार, कॉ बाबासाहेब पाकजादे, कॉ संतोष बेलदार,कॉ विद्या भोरे, कॉ सोनाली चव्हाण, कॉ सिकंदर शेरकर, कॉ अमोल माने, कॉ बाळासाहेब कोल्हे, कॉ शांता चव्हाण, व कॉ अर्चना बेळंकी इत्यादींची निवड करण्यात आली. असे पत्रक निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या जनरल सेक्रेटरी प्रा. शरयू बडवे यांनी प्रसिद्ध दिलेले आहे.