विशेष लेख

खोकेनाथ अंधा-या रात्री लढणारे क्रांतीवीर ?’

‘खोकेनाथ अंधा-या रात्री लढणारे क्रांतीवीर ?’

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

भटाला दिली ओसरी अन् भट हळूहळू पाय पसरी ही मराठीतील म्हण केवळ ब्राम्हण व पुरोहीतांसाठी लागू होत होती मात्र आज ती सर्वच राजकीय पक्षातील त्यांची जोडी उचलणा-यांना लागू पडते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण एकनाथ शिंदे या एका रिक्षा चालकाला प्रबोधनकार ठाकरे यांचे चिरंजीव बाळासाहेब ठाकरे यांनी साथसहयोग देऊन एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्याच शिवसेनेने संघप्रणित भाजप या राजकीय पक्षासोबत महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांच्या मदतीने येथे आपली पाळेमुळे घट्ट रोवली ती शिवसेनेच्या समुळ उच्चाटनासाठी होती हे आजचे चित्र पाहुन स्पष्ट होते. कारण हिंदूत्वाचा पुरस्कार करणा-या शिवसेनेला माहीतही नसेल की, हेच हिंदुत्व आपला घात करणार आहे‌. हिंदूत्व म्हणजे काय हे ज्यांना माहीतच नाही त्या हातांना बळ देण्याचे काम बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांनी केले त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा दिड दिवसाचा गणपती झाला असं म्हटलं तरी चुकणार नाही. ज्या चाळीस लोकांना बाळासाहेब ठाकरे यांनी ओसरी दिली त्यांनी त्या ओसरीवर पाय पसरत शिवसेना संपवून एका क्षणात होत्याचं नव्हत केल ते केवळ संघ विचारांचा प्रचार आणि प्रसार केल्यामुळे कारण संघाचे विचार हे तोडणारे आहेत हे आता तरी उद्धव ठाकरे यांनी समजून घेणे काळाची गरज आहे अन्यथा अजूनही जर ब्राम्हणवादी हस्तकांना ओसरी दिली तर परत आपल्या पक्षाचा दीड दिवसाचा गणपती होऊ नये याची खबरदारी घ्यावी. कारण कपडे बदलून रात्रीच्या भेटी घेऊन गळ्यात गळे घालून मागचे मळे मारणा-या संघाचे समर्थक खोकेनाथ म्हणजे अंधा-या रात्री लढणारे क्रांतीवीर आहेत असं म्हटलं तर आमचं काय चुकणार आहे ?.
शिवतीर्थावर सभा कोणाची होणार असा रंगीन सामना न्यायालयात झाल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवतीर्थावरील सभेला मंजूरी मिळाली. त्यामुळे शिंदे गटाला बीकेसीचा पर्याय निवडावा लागला. तेथिल सभेला गर्दी जमवण्यासाठी लोकांना रोजगार देऊन आणावं लागलं अशी लोकांमध्ये चर्चा आहे. या व्यासपीठावर बोलका पोपट अशी ज्यांची ओळख आहे ते समलैंगिक खेळावाल्यांचा प्रचार आणि प्रसार करणारे शरद पोंक्षे उपस्थित होते. तेव्हा ते म्हणाले की, ‘हिंदूत्वावर बोलण्यासाठी मला साधारणतः तास दीड तास लागतो.’ मग प्रश्न पडतो की, एक तास दीड तासाच झंडूत्व आमच्या जीवनात काय परिवर्तन घडवून आणणार आहे ? आमच्या घरातील शेंबड पोरं शौच्छालयात गेल्यास एक तास तिथेच गुंणगणत बसत पण ते लवकर बाहेर निघत नाही त्यामुळे मला वाटतं की, शेंबड्या पोरांचं बाथरुममध्ये गुणगुण करणं आणि पोंक्षेच एक तास व्यासपीठावर हिंदूत्व झाडणे यात फरक काय आहे ? कारण दोन्ही पासुन आजपर्यंत कोणालाच फायदा झाला नाही.
मा. उद्धव ठाकरेंशी काडीमोड करून हिंदूत्वाच्या नावान आपलं नवीन दुकान थाटलेले मा. एकनाथ शिंदे यांचा बीकेसी वरील दसरा मेळावा गाजला आणि लिहून दिलेल्या भाषणामुळे वाजला. कारण त्यांनी पाठीमागे लावलेल्या बॅनरवर ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हे वाक्य लिहिलं होतं त्यामुळे प्रश्न पडतो की, गर्वाने जर आम्ही हिंदू आहोत असं सांगितल्यास आमचे प्रश्न मार्गी लागणार आहेत का ? देशाचं नाव भारत असताना हे स्क्रीप्टवाले काय म्हणून हिंदूस्थान हिंदूस्थान म्हणून बोंब मारत असतील ? शिंदे म्हणतात की, आम्ही घेतलेल्या भुमिकेला पाठिंबा मिळतोय, कारण मी महाराष्ट्रात फिरताना जनता प्रतिसाद देते. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार आहोत. २०१९ ला उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली, आम्ही गद्दार नाही तर गदर असून गदर म्हणजे उठाव क्रांती आहे. देशाच्या उभारणीमध्ये आरएसएसचे मोलाचे योगदान आहे, देशात आपत्ती संकटे येतात तेव्हा आरएसएसचे लोक पुढे असतात. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी करणे मुर्खपणा आहे असं एकनाथ शेवटी म्हणाले. तेव्हा त्या बाबा स्क्रीप्टधारींना काही प्रश्न विचारावे वाटतात की, लोक जमतात म्हणजे प्रतिसाद मिळतोय म्हणणे म्हणजे चुकीचे वाटत नाही का ? कारण एक श्वान दुस-या गल्लीत भटकंती करत असल्यास त्या गल्लीतील सर्व श्वान एकत्र येतात म्हणजे ते काय त्यांच्या स्वागतासाठी असतात का ? तुम्ही बाळासाहेबांच्या वारसदारांचे वारसदार ? असाल हे संशयास्पद आहे पण आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा बाप मात्र नक्की वाचला आहे त्यामुळे तुम्ही कोणाचे वारसदार आहात हे स्पष्ट होते. तुम्ही गद्दार आहात असं महाराष्ट्रातील जनता खुलेआम म्हणते तरीपण तुम्ही जर स्वतःला गदर समजत असाल तर तुमची सकीना (फडणवीस ?) सोबत रात्रीच्या वेळी कपडे बदलून भेटत असताना कशाचा उठाव करत होतात ? रात्रीचे चाळे तोंडावाटे लाळ गळे याला क्रांती म्हणतात का ? देशात झालेल्या बाॅम्बस्फोटातील बहुतांश बाॅम्बस्फोट हे आरएसएस, अभिनव भारत, विश्व हिंदू परिषदने घडवले आहेत यांचे शंभर टक्के पुरावे ‘करकरेंना का व कोणी मारले ?’ या पुस्तकात असताना जर शिंदे तोंडाला येईल ते बोलत असतील तर शिंदेंच्या ओठांना रेशिमबागेतील रेशिम किड्याने दंश केला आहे असं म्हटल्यास काय चुकीचे आहे ? देशात सर्वांधीक संकटे ही आरएसएस निर्माण करते ती काय लोकांना संकटात मदत करणार आहे ? अक्कलशुन्य ? एकनाथ शिंदे यांनी लोकांच्या मागणीला मुर्खपणा समजण्यापेक्षा आपल्या मस्तकात मेंदू आहे का याची चाचपणी करायला काय अडचण आहे ? मोदी चाय विकत होते हे स्वतः त्यांनीच अनेक वेळा आपल्या भाषणात सांगितले आहे, मग त्यांना चायवाला नाहीतर काय हजामवाला म्हणायचे का ? एकनाथ शिंदेंनी खुशाल संघाची चड्डी परिधान करावी पण संघाचे गोडवे गाण्यासाठी लोकांना चुकीची माहीती सांगून आपल्या अल्प बुध्दीचे खुले प्रदर्शन करू नये. कारण हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो इथे प्रतिगामी विचार पायदळी तुडवून त्यांची होळी केली जाते हे खोकेनाथ ने समजून घ्यावे.
शिंदे गटाचे आमदार जेव्हा गुवाहाटी मध्ये झाडी डोंगर पाहात होते तेव्हा इकडे महाराष्ट्रात रडून रडून डोळ्यातून पाण्याचे पाट काढणारे हेच ते रामदास कदम होते. पण नंतर मात्र कदमांची आपली भाषा बदलत यांनी गटच बदलला मग प्रश्न पडतो की, कदमांच्या डोळ्यातलं पाणी कुठे आणि किती खोक्यात मुरले ? तेच रामदास कदम म्हणतात की, कोण ती अंधारे बाई ? कोण तो लांडगा भास्कर जाधव ? या बाडग्यांना आम्ही सोडणार नाही कारण या ४० आमदारांनी देशात क्रांती केली आहे.’ कदमांच्या मतानूसार गुवाहाटी गोवा फिरून दरी झाडी डोंगरात फोन बंद करून बसणे ही क्रांती आहे का ? मतदारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून हाॅटेलमध्ये मजा मारणे याला क्रांती कोण म्हणेल ? सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश का केला हे त्यांनाच माहीत पण आज त्या जे प्रश्न उपस्थित करतात त्यांची उत्तरे रामदास कदम व त्यांचा शिंदे गट कधीच देऊ शकणार नाहीत कारण उत्तरे देण्यासाठी डोळ्यातील पाणी आणि गुवाहाटी फिरण म्हत्वाच नाहीतर वाचणं म्हत्वाच आहे. या ४० आमदारांची आणि पुस्तकाची भेट कधी झाली असेल ? जर पुस्तकांचा आणि यांच्या डोक्याचा संबंध आलाच असता तर यांनी एकमेकांना बोलताना लांडगा हा शब्दप्रयोग वापरला असता का ?
बीकेसी येथिल दसरा मेळाव्यात जयदेव ठाकरे म्हणाले की, आम्ही ठाकरे आहोत भाषण करताना आम्ही काही लिखित घेऊन येत नाहीत, एकनाथ यांना एकटानाथ होऊ देऊ नका. हा राबकरी कष्टकरी आहे, परत निवडणूका घेऊन शिंदे राज्य येऊद्या.’ बिकेसीवरून जयदेव ठाकरे जाताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जे भाषण केलं ते जयदेव ठाकरे यांनी ऐकलं बघितलं नसेल का ? कारण राबकरी कष्टकरी एकनाथ शिंदेंनी केलेलं भाषण कोणी राबून कष्ट घेऊन लिहून दिले होते ? जो व्यक्ती लिहून दिलेली भाषण वाचणं करतो तो काय आमच्यासाठी कष्ट घेऊन राबणार आहे ? तो कष्ट घेईल समलैंगिक संघोट्यासाठी, तो राबेल प्रदीप जोशींची पप्पी लोकप्रिय होण्यासाठी त्यामुळे त्यांच्या कष्टाचे कारनामे आमच्यापुढे हेपलणे निव्वळ मुर्खपणाचे आहे असं म्हटलं तर काय चुकणार आहे ?
मा. गुलाबराव पाटील म्हणाले की, आपले मुख्यमंत्री अनाथांचे नाथ एकनाथ असून ते पहाटे पाच वाजेपर्यंत काम करणारे मुख्यमंत्री आहेत. जगातील ३३ देशांनी या माणसांची दखल घेतली त्यामुळे आम्हाला आडवे येणा-यांचा सत्यानाश होवो.’ इतरांचा सत्यानाश होवो असं म्हणणा-या गुलाबराव पाटील यांनी नेमका कोणता गांजा मारला होता ? कारण कोणाच्या बोलण्याने कोणाचं वाईट होत का हे गुलाबराव यांना समजत नसेल तर हे मंत्रीपदाच्या लायकीचे तरी आहेत का ? मा. एकनाथ शिंदे पहाटे पाचेपर्यंत कामे नेमकी कोणाची करतात ? रात्री वेगळे कपडे घालून ते फडणवीसांच्या भेटीला प्रदीप जोशींचे चाळे करायला तर रात्रभर जात नसतील ? त्यामुळे त्या भेटीत केव्हा पाच वाजले हे त्यांना समजत नसेल. कारण प्रदीप जोशींचे चाळे करणारा एकटा नाथ नसतो तर त्याचा सोबती पण साथ साथ असतो हे गुलाबराव पाटील यांना काय मोहन भागवतांनी मिठीत घेऊन सांगावे का ?
त्यामुळे बहुजन समाजाला सांगावं वाटतं की, हिंदुत्वाच्या बाजार गप्पा मारणा-यापासून दूर रहा कारण जे आज हिंदूत्वाच्या गप्पा मारत आहेत ते काल परवा स्वतः च्या स्वार्थासाठी डोंगर झाडी गुवाहाटी गोवा फिरत होते. त्यामुळे यांना जर लबाड लांडग्यांचा कळप ? म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही कारण यांच्या पृष्ठभागाखाली भ्रष्टाचाराच्या फाईली असल्यामुळे त्यांना हे हिंदूंत्व आठवत आहे. त्यामुळे या कळपापासून दूर रहा कारण लांडग्यांच्या तोंडी रक्त लागले तर तो घात केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे वेळीच सावध व्हा आज त्यांनी ठाकरेंचा घात केला त्यामुळे तुम्ही आम्ही कोण आहोत ? याचा विचार करा कारण अजून वेळ बाकी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!