डॉ. जे. जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या १६१ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

डॉ. जे. जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या १६१ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड
जयसिंगपूर – येथील डॉ.जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग मधील १६१ विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी, टीसीएस, विप्रो तसेच इन्फोसिस यासारख्या जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली,अशी माहिती महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील अडमुठे व प्र. प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी दिली. यावेळी ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा. प्रसाद माळगे यांनी सांगितले की, महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षापासूनच विविध कंपन्यांच्या गरजांनुसार लागणारे सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, टेक्निकल ट्रेनिंग, अपटीट्युड टेस्ट, ग्रुप डिस्कशन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तसेच टेक्निकल आणि पर्सनल इंटरव्हूयचे प्रशिक्षण दिले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे ज्ञान व अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन त्यांना जास्तीत जास्त पॅकेजच्या नोकऱ्यांची संधी मिळवून देण्यास व प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतःचे करिअर घडविण्याची क्षमता तयार होण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करत असते. मिळालेल्या संधीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
गेली तीस वर्षे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात कार्यरत असलेल्या डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग मार्फत हजारो विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या असून येत्या शैक्षणिक वर्षात अधिकाधिक विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संस्थेचे चेअरमन डॉ.विजय मगदूम व व्हा.चेअरपर्सन ॲड.डॉ. सौ.सोनाली मगदूम यांनी नमूद केले.