विशेष लेख

असत्य’नारायणाचा बाजार उठवणारे गाडगेबाबा

‘असत्य’नारायणाचा बाजार उठवणारे गाडगेबाबा

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

सत्यनारायण ही देवाची भक्ती नाही, ही भटांची रोजगार हमी योजना आहे, हा च्युत्याचा बाजार आहे असं आपल्या किर्तनातून सांगणारे संत गाडगेबाबा सांगत. त्या गाडगेबाबांना जाणून घेण्यासाठी मेंदू असावा लागतो पण तो प्रत्येकाच्या डोक्यात असेलच हे सांगता येत नाही. कारण मागील आघाडी सरकारने गाडगेबाबा यांची दशसूत्री ही मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर लावली होती. त्यातून जो संदेश दिला जातो तो मानवतावादी असल्यामुळे तो अमानवतादी कृत्ये करणारांना पटेल का ? ज्यांची मति भ्रमिष्ट झालेली आहे त्यांना गाडगेबाबा म्हणजे फक्त घाण साफ करायचे याव्यतिरिक्त माहीत तरी काय असणार आहे ? ज्यांचा उभ्या जन्म ब्राम्हणांचे पाय चाटण्यात जात आहे ते लोक गाडगेबाबांच्या दशसूत्री कडे दुर्लक्ष करणार नाहीतर दुसर काय करणार आहेत ? मंत्रालयात सत्यनारायण पुजेचे घाट बांधून भटांच्या पायावर मस्तक टेकणारे एकनाथ शिंदे दुसरं करू शकतात तरी काय ? त्यांच्याकडून गाडगेबाबांच्या सन्मानाची अपेक्षा करणे म्हणजे वांझोट्या गायीचे दूध काढण्यासारखे आहे ? सत्यनारायण पुजेच्या पुढे लोळण घेणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर बसण्याच्या लायकीचे तरी आहेत का ? यांच्या डोक्यात केवळ गाय गोबर मंदीर मस्जिद देव देवळे यांचा भरणा आहे, यांचा आणि विज्ञानवादाचा उभ्या आयुष्यात मेळ बसला की नाही हे तर बलात्कारी ब्रम्ह्या अथवा परशुरामच जाणो ?
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर १२ मार्च २०२० रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संत गाडगेबाबा यांची शिकवण असलेल्या ‘दशसुत्री’चा फलक लावला होता. नव्या सरकारने हा फलकच काढून टाकल्याने संत गाडगेबाबांच्या अनुयायांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर प्रबोधन करून रचनात्मक काम उभे केले. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांचे रोखठोक चरित्र लिहिले, त्या पुस्तकासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी मुखपृष्ठ काढले होते. त्यामुळे ठाकरे कुटुंबाशी संत गाडगेबाबा यांची नाळ जुळली होती. या वैचारिक बांधिलकीतूनच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर संत गाडगेबाबा यांची दशसुत्री लावण्यात येईल, असे आश्वासन नागपूर येथे दिले व ही दशसूत्री त्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर लावलीसुद्धा. त्यावर मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांची स्वाक्षरीसुद्धा होती. (लोकसत्ता ०१ आक्टो २०२२) पण हाच गाडगेबाबांच्या दशसूत्री चा फलक ‘असत्य’नारायण पुजेचा घाट बांधणा-या शिंदे सरकारने काढून टाकल्यामुळे काही संघटनांनी सरखारला आंदोलनाचा इशारा देताच उपमुख्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांचा पितांबर पिवळा झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असे म्हणता येईल. कारण संघटना म्हणत आहेत की, हा दशसुत्रीचा फलक पूर्ववत लावून संत गाडगेबाबांच्या विचारांशी प्रामाणिक आहोत हे सरकारने दाखवून द्यावे.
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरील संत गाडगेबाबांच्या ‘दशसूत्री’चा फलक हटविण्यात आल्याचे कळताच राज्यभरातून तीव्र भावना व्यक्त व्हायला लागल्या त्यात संत गाडगेबाबा मिशन, मुंबईच्या अध्यक्षा अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हटले की, ज्या संत-महात्म्याच्या विचारांवर महाराष्ट्र उभा आहे, अशा संतांचे प्रेरणादायी विचार मंत्रालयासारख्या जनतेच्या प्रातिनिधिक वास्तूमधून परस्पर हटविणे हे अयोग्य आहे. ज्यांनी हे कर्म केले, त्यांनी जनतेची जाहीरपणे माफी मागावी. (अॅग्रोवन ०१ आक्टो २०२२) तसेच संतोष अरसोड म्हणाले की, संत गाडगेबाबा यांनी सांगितलेला विचार महाराष्ट्राचा श्वास आहे. दशसुत्री हटवून हा श्वास रोखून धरण्याचा हा अश्लाघ्य प्रकार आहे. बाबांनी सांगितलेल्या दशसुत्रीनुसार वागताना नैतिक बळ आवश्यक असते. सरकारचे हे नैतिक बळ हरवले आहे म्हणूनच हा फलक हटवला असावा. संत गाडगेबाबा यांनी दिलेल्या वैचारिक अधिष्ठानावर घातलेला हा घाला आहे. (लोकसत्ता ०१ आक्टो २०२२) सरकारला लंगोटीवर भ्रमंती करणारा रामदास आणि बलात्कार करणारा आसाराम यांचा पुळका आहे पण ज्यांना समाजाने जंत म्हणून घोषीत केले ते फडणवीस शिंदे या जोडगोळीचे आदर्श आहेत ? त्यामुळे त्यांना गाडगेबाबा आणि त्यांचे विचार थोडी सहन होणार आहेत. पण समाजाने घेतलेल्या उठाव पाहुन पितांबर परिधान करणारे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, फलक काढण्यात आलेला नाही. फलकावर रेघोट्या उमटल्या होत्या. विद्रूप दिसत असल्याने तो काढण्यात आला. नव्याने तयार करून तो फलक दोन दिवसात लावण्यात येईल. (लोकसत्ता ०१ आक्टो २०२२) फलकावर रेघोट्या उमटल्या होत्या असं म्हणणा-या देवेंद्र फडणवीस यांना विचारावं वाटत की, ज्या सावरकरांनी जेलमध्ये भिंतीवर रेघोट्या मारल्या त्याच मानसिकतेच्या विकृतींनी पाठीमागे मुख्यमंत्री महोदयांचे शासकीय निवासस्थान सोडताना भिंती रंगवल्या होत्या त्याच मनुच्या पिलावळींनी गाडगेबाबांच्या फलकावर रोघोट्या मारल्या नसतील कशावरून ? कारण रेघोट्या मारून सर्व काही कमावल्याचा भास तर रामदासीवृत्तीच्या मनोरूग्णा होतो हा तुमचाच इतिहास आहे. त्यामुळे रेघोट्या का आणि कोणी मारल्या यांचा काही अभ्यास करता येईल का ? गाडगेबाबांच्या दशसूत्री फलक लवकरात लवकर बसवा अन्यथा तुमच्या बापजादांची दुकानदारी चालणारा सत्यानारायण ही भटाची रोजगार हमी योजना आहे हे गाडगेबाबांचे वाक्य आम्हाला गावच्या मध्यवर्ती भागात लावण्यास वेळ लागणार नाही.
संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीत मानवतावाद सामावलेला आहे. भुकेलेल्यांना अन्न; तहानलेल्यांना पाणी; उघड्यानागड्यांना वस्त्र; गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत; बेघरांना निवारा, आश्रय; अंध, पंगू, रोग्यांना औषधोपचार; बेरोजगारांना रोजगार; पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना अभय; गरीब तरुण तरुणींचे लग्न; दुःखी व निराशांना हिम्मत या बाबी दशसूत्रीमध्ये नमूद आहेत. इतके मानवतावादी विचार असलेला दशसूत्री हा फलक या महाराष्ट्रातील ‘खोके एकदम ओके, पैसे घेऊन मोकळे झाले बोक्के’ वाल्यांनी काढला ही लाजीरवाणी गोष्ट आहे. कारण या गाडगेबाबांच्या दशसूत्री मधील कोणत्या बाबी सरकारला खटकल्या अशी विचारणा होऊ लागली आहे. गाडगेबाबांनी सोप्या भाषेत स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. दिवसभर गाव स्वच्छ केल्यानंतर रात्री कीर्तनाच्या माध्यमातून ते लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धा व विषमतेची घाण साफ करत करत ते ‘देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, तंत्र-मंत्र, चमत्कार यावर विश्वास ठेवू नका’, देव दगडात नसून तो माणसांत आहे अशी शिकवण होते. अशा मानवतावादी संत गाडगेबाबा यांची दशसूत्री काढणारे हे भडवे मनुवादी नाहीतर कोण आहेत ? त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे म्हणाले की, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची समाजसेवी दशसूत्री महाराष्ट्र सरकारने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरून हटविली आहे. कारण सध्याला सरकारला गाडगेबाबांच्या विचारांचा तिटकारा असल्यामुळे व हे सरकार संत विरोधी विचारांचे व जंत समर्थक रामदासी विचारांचे असल्यामुळे त्यांनी ती काढून टाकल्यामुळे संत गाडगेबाबा यांचा व त्यांच्या विचारांचा अवमान करण्याचे कपट ह्या वामनपंथी सरकारने केले आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने याविरोधात आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्र सरकारने केलेल्या या गैरकृत्याचा जाहीर निषेध केला. तसेच संभाजी ब्रिगेडच्या वतीने ०२ आॅक्टोबर गांधी जयंतीदिनी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे. लवकरात लवकर जर गाडगेबाबांची दशसूत्री या रामदासी सरकारने पुर्वीप्रमाणे नाही तर ब्रिगेडी स्टाईलने आंदोलन देखील करण्यात येईल अशा इशारा दिला. (०१ आक्टो २०२२) तेव्हा सरकारने वेळीच सावध होऊन गाडगेबाबांची दशसूत्री पुर्ववत लावावी अन्यथा संभाजी ब्रिगेड ही विचार आणि कृती करणारी संघटना आहे. संभाजी ब्रिगेडचा विचार आणि कृतीचा कार्यक्रम हा मणका बघून दणका देणारा असतो हे बाबा पुरंदरे, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ, लोकसत्ता संपादक गिरिष कुबेर यांना माहीत आहे त्यामुळे वेळ न घालवता दशसूत्रीचा फलक लावा अन्यथा गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!