विशेष लेख

रंगा हाच पनवती दिनाचा खरा मानकरी ?

रंगा हाच पनवती दिनाचा खरा मानकरी ?

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
मो. ९७६२६३६६६२

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील ज्याला हत्यारे म्हणतात त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी होता. त्यादिवशी चळवळीतील लोक पेरियार रामसामी, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे व काॅम्रेड शरद पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा व विचारांचा प्रचार प्रसार करत होते. तर दुसरीकडे खोटी स्वप्ने दाखवून भारतातील तरुणांना बेरोजगार करणारे नरेंद्र मोदी हे देशाच्या इतिहासातील एकमेव पंतप्रधान असून त्यांचा जन्मदिवस हा ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ म्हणून साजरा करून सोशल मिडीयावर बिडंबनात्मक शुभेच्छा देत होते. याच सोशल मिडीयाचा वापर करून भाजपने ‘हर घर मोदी, घर घर मोदी’ ची प्रतिमा पोहोचवली, त्याच मिडीयाने याच चौकीदाराला पार उघड नागड केलं ही सोशल मिडीयाची किमया आहे. कारण हा मिडीया आज तरी कोण्या भांडवलदारांचा बटीक झालेला नाही.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच अनेकांनी त्यांच्यावर खोचक टिकेचे ट्विट करत शुभेच्छाही दिल्यात. (थोडक्यात १७ सप्टेंबर २०२२) नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंधभक्तांनी अनेक कार्यक्रमाचे केले, त्या अंधभक्तांना विचारावं वाटत की, मोदींच्या वाढदिवसाचे निमित्त साधून पकोडे कसे विकायचे यांचा एखादा कार्यक्रम का घेतला नाही ? तुम्ही ज्याच्या नावाने कार्यक्रम आयोजित करतात तो व्यक्ती ईव्हीएम मशीन्सची पैदाइश ? आहे असं म्हटल्यास काहीच चुकणार नाही. कारण काॅग्रेस व भाजपच्या संगणमताने ईव्हीएम मशीन दररोज गाभण घातली जाते हे कोणीही नाकारू शकत नाही. दोन कोटी तरुणांना नौकरी देण्याचे स्वप्न दाखवून तरुणांच्या आयुष्याची होळी करणा-या व्यक्तीचा आम्ही कारण म्हणून वाढदिवस साजरा करावा ? याचा विचार आमचा तरुण करणार आहे की नाही.
.देशात अंधभक्तांचा थवा एकत्रित करून त्यांच्यापुढे गुजरात दंगलीचा मोहरक्या ? हा जणू भक्तापुढे देव स्वरुपात सादर केल्यामुळे भक्तांड त्याच्यापुढे लोटांगण घेत आहेत. त्यामुळे हा थवा म्हणजे बुद्धीहीन गाढवांचा कळप आहे असं म्हटलं तर कोणी शहाणा माणूस ते नाकारणार नाही. नरेंद्र मोदींचा फेकण्यात एक नंबर लागेल असं वाटतं कारण दोन कोटी तरुणांना रोजगार निर्मिती, स्मार्टसिटी, अच्छे दिन, काळा पैसे, नोटबंदीतून नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडण्याचे तंत्रज्ञान ह्याचा बोलबाला करून तरुणांची मती भ्रमिष्ट करणारा फोटोजीवी खोटं बोलण्यात तेवढा पटाईत आहे ? म्हणून तर काँग्रेसने नरेंद्र मोदींचा जन्मदिवस हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस असल्याचं म्हटलं जात आहे. कारण दोन कोटी नोकऱ्यांच्या आश्वासनावरुन काँग्रेसने नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे. (थोडक्यात १७ सप्टेंबर २०२२)
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा करायची कोणत्याही तरुणाला हौस नाही. पण तरुणांना खोटी स्वप्ने दाखवून तरुण भारताला बेरोजगार करणारे नरेंद्र मोदी हे इतिहासातील एकमेव पंतप्रधान आहेत, अशी टीका भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. वी त्यांनी केली. (थोडक्यात १७ सप्टेंबर २०२२) देशातील जनतेला अच्छे दिनची स्वप्ने दाखवून डोळ्यात धूळ फेकण्याच काम मोदी शेठनी केलं आहे. ह्या शेठचा जन्मदिनच येथिल मुलनिवासी बहुजन समाजाला लागलेले एक ग्रहण आहे ? तरुणांनी नरेंद्र मोदींचा जन्मदिवस पनवती दिन ? म्हणून साजरा करून त्यात २०१४ पुर्वीच्या ‘मेरे प्यारे भाई और बहनो’ या फेकाफेकीच्या व्हिडिओ क्लिप लावायला पाहीजेत. मोदी सत्तेत नव्हते तेव्हा मात्र अच्छे दिवस येतील वाटत होते ? पण जसा काजव्याच्या ढुंगणातील उजेड हा फक्त रात्री दिसतो, पण दिवसभर तो काजवा आणि त्याचे लाल ढुंगण कुठे गायब होते काय माहीत ? त्यामुळे रात्री चमकणा-या काजव्याच्या ढुंगातील लालबुंद उजेड म्हणजे अच्छे दिन आहेत असं म्हटलं तर काय चुकीचे आहे ?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणतात की, ‘पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळेच देशाचे स्वरूप बदलत आहे.’ तेव्हा प्रश्न पडतो की, देश आणि देशातील जनतेला देशोधडीला लावणे यालाच नरेंद्र मोदींचा पारदर्शक कारभार म्हणायचे का ? भ्रष्टाचार मुक्त भारत घडवण्याचे स्वप्न बघणारे नरेंद्र मोदीच ईव्हीएम मशिनमध्ये घोळ करून निवडूण आले आहेत त्याचे काय ? या काॅग्रेस व भाजपाई बांडगूळांकडून भ्रष्टाचार मुक्त भारताची अपेक्षा करणे म्हणजे वांझोट्या गायीचे दूध काढण्यासारखे आहे असं म्हटल तर आमचं काय चुकेल ? त्यामुळे निर्मला सीतारामण यांनी कितीही फोटोजीवी मोदींची नसलेली प्रतीमा उंचावण्याचा प्रयत्न केला तरी त्यात त्या यशस्वी होणार नाहीत. कारण मोदींचा खरा रंग आणि त्यांनी घातलेली संघाच्या विचारांची आर्धी चड्डी सर्व सामान्यांच्या नजरेस पडली आहे. कारण गुजराती बांडगुळांनी देश पोखरला आहे असं म्हटलं तरी चालेल, म्हणूनच की एकदा उच्च न्यायालयाने म्हटले होते की, ‘गुजरात म्हणजे बुडणार जहाज आहे’ ह्याच गुजराती होडीतील नावाडी आज देश चालवतोय मग हा देश बुडणार नाही तर काय होणार आहे ? यांचा विचार बहुजन समाजाला करावा लागेल नाहीतर हे विध्नसंतोषी लोक उद्या रात्रीच देश विकू नयेत म्हणजे कल्याण झाले.
देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करून न्यायव्यवस्था धाब्यावर बसवण्यासाठी रंगा बिल्लाची जोड सदैव तत्पर असते हे ओळखल्यामुळे जेष्ठ वकील प्रशांत भूषण म्हणतात की, ‘मोदी सरकार सर्व तपास यंत्रणा आणि गुप्तहेर यंत्रणांचा वापर करून प्रत्येक न्यायाधीशाचा एक डोजियर तयार करते आणि त्या डोजियरमध्ये न्यायधीशाचा कुठलाही कच्चा दूवा लक्षात आल्यावर त्याचा वापर करून न्यायाधीशावर दबाव आणला जातो.’ त्यामुळे तरुणांनी आतातरी जागे झाले पाहीजे, जो जागत नाही तो मेल्यात जमा आहे ? त्या बुद्धीने मेलेल्यांना कोणीतरी सांगा की, देश आणि स्वत: तु संकटात आहेस, असं म्हणून त्याला गदागदा हालवून उठवा. कारण तुम्हीच हे काम करू शकता का तर तुम्ही जागे आहात याच भान ठेवा. जो जागा झाला आहे त्यानेच तर मोदींचा जन्मदिवस हा ‘बेरोजगार दिन’ म्हणून साजरा केला. परंतु बहुजनातील काही सडक्या किड्यांनी मोदींचा वाढदिवस जणू बापाचा वाढदिवस असल्यासारखं वाजत गाजत साजरा केला. त्यामुळे झोपलेल्यांना जाग तुम्हीच करू शकता याची जाणीव ठेऊन कामाला लागा एवढीच एक अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!