कोल्हापूर

शनिवारी प्रबोधिनीत व्याख्यान


शनिवारी प्रबोधिनीत व्याख्यान
––——————-
इचलकरंजी ता. १५ ,समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने थोर स्वातंत्र्य सैनिक आणि प्रतिसरकारचे सेनानी क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त शनिवार ता.१७ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ” क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांचे विचार आणि वर्तमान ” या विषयावर ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.बाबुराव गुरव (तासगाव )हे प्रमुख वक्ते म्हणून मांडणी करणार आहेत. अध्यक्षस्थानी पदवीधर मतदार संघाचे आमदार अरुणअण्णा लाड हे आहेत. तरी या व्याख्यानाला सर्व जिज्ञासू नागरिक बंधू-भगिनीने उपस्थित रहावे असे आवाहन समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!