कोल्हापूरदेश-विदेश

डॉ . प्रा . शरद गायकवाड यांना मॉरिशियस चा आंतरराष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार ; राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराज रुपण यांच्या हस्ते होणार पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर महावीर विद्यालयातील मराठी विभागाचे डॉक्टर प्राध्यापक शरद गायकवाड यांना मॉरिशिसचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला मॉरिशिस येथील मराठी भाषा मंडळाचे अध्यक्ष असंत गोविंद यांनी पुरस्कार निवडीचे पत्र त्यांना पाठवले आहे

पुरस्काराचे वितरण 27 सप्टेंबरला मॉरिशस येथे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराज रुपन यांच्या हस्ते होणार आहे डॉक्टर गायकवाड यांना नाशिक व कोल्हापुर येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषवले आहे त्याचबरोबर समाज प्रबोधन चळवळीत आधारित एकूण 11 वैचारिक ग्रंथाचे लेखन केले आहे पोतराज प्रथा जटा निर्मूलन अंधश्रद्धा निर्मूलन जाती तोडो समाज जोडो व्यसनमुक्ती अभियान संविधान साक्षरता विचारांच्या पेरणीबरोबर समाजवादी धर्मनिरपेक्ष समाज निर्मितीसाठी त्यांनी तीस वर्षाहून अधिक काळ समाजसेवेची कार्य केले आहे मराठवाडा विदर्भ खानदेश कोकण तसेच आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक गोवा राज्यातून शेकडो व्याख्याने दिले आहेत त्यांच्या योगदानीची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी त्यांना आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारण मंडळाचे चेअरमन अॅड .के. ए . कापसे सचिव मोहन गरगटे व प्राचार्य डॉक्टर राजेंद्र लोखंडे यांचे प्रोत्साहन मिळाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!