महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटकच्या वतीने बांद्रा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळासमोर प्रमुख कार्यकर्त्यांची तीव्र निदर्शने!

महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटकच्या वतीने बांद्रा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळासमोर प्रमुख कार्यकर्त्यांची तीव्र निदर्शने!
सध्या मागील एक वर्षापासून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अस्तित्वात नसल्यामुळे कामगारांचे प्रश्न सुटणे जटील बनलेले आहे. म्हणूनच ताबडतोब बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये कामगार प्रतिनिधी, मालक प्रतिनिधी व अध्यक्ष यांची निवड करावी अशी मागणी करण्यात आली.
त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये शेकडो नोंदीत बांधकाम कामगारांचा मृत्यू झालेला आहे परंतु त्यांच्या वारसांना व विधवा महिलांना अजूनही दोन लाख रुपयाची योजनेअंतर्गत तरतूद असलेली आर्थिक मदत मिळालेली नाही. मागील एक महिन्यांमध्ये आयटक फेडरेशनच्या वतीने केलेल्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील अनेक विधवा महिलांना आधार व आर्थिक सहाय्य मिळालेले आहे
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत असा निर्णय घेण्यात आलेला आहे की, ग्रामीण व शहरी भागामध्ये नोंदीत बांधकाम कामगारांच्या घरकुल बांधणीसाठी दोन लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. परंतु या योजनेची अंमलबजावणी सरकारी अधिकारी उत्साहाने करीत नाहीत. म्हणून ताबडतोब जे दाखल अर्ज झालेले असतील त्यांचे अर्ज त्वरीत मंजूर करावेत अशी मागणी करण्यात आली. मुलीच्या विवाहसाठी 51 हजार रुपये देण्याचा निर्णय दोन मुलींच्या विवाहासाठी मिळणे आवश्यक आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये लाखो अर्ज नवीन नोंदणीसाठी, नूतनीकरण व लाभ मिळण्यासाठी प्रलंबित आहेत. तरी ताबडतोब ते सर्व निकाले करावेत अशी मागणी करण्यात आली.
याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना फेडरेशन आयटक यांच्या वतीने ईमेल द्वारे आठ दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना पाठविण्यात आलेले होते. त्यांनी त्या निवेदनाची त्वरीत दखल घेऊन योग्य त्या कारवाईसाठी कामगार विभागाकडे ते निवेदन पाठवल्यानंतर जलदी गतीने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत कामास सुरुवात झाली.
महाराष्ट्र बांधकाम कल्याणकारी मंडळाचे वित्त अधिकारी श्री गायकवाड यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉ शंकर पुजारी, कॉ सुनील पाटील, कॉ रमेश जाधव, कॉ साक्षी पाटील, प्रकाश खंडागळे, कॉ उन्हती काळे, कॉम्रेड गणेश वावूल कॉ शाबिरा शेरेकर इत्यादींनी केले.