कोल्हापूर

विवेकानंद ट्रस्टच्या देश रक्षाबंधन सोहळ्यात ७५ शाळांसह ३५ महिला बचत गटांकडून ७०हजार राख्यांचे संकलन 

विवेकानंद ट्रस्टच्या देश रक्षाबंधन सोहळ्यात ७५ शाळांसह ३५ महिला बचत गटांकडून ७०हजार राख्यांचे संकलन 
कारगिल युद्धात सहभागी जवान निवृत्त्त सैनिक,अधिकारी ,वीरमाता ,विध्यार्थी शिक्षक वर्गाच्या सहभागाने देश भक्तीचा धागा झाला अधिक दृढ कारगिल सिमेवर लढताना कोल्हापूरहून आलेली राखी ठरली लाख मोलाची -सैनिक कल्याण अधिकारी मेजर शिवाजीराव पोवार 
कोल्हापूर-: भारतमातेच्या रक्षणासाठी कारगिल युद्धात लढताना कोल्हापूरहुन आलेल्या राख्यांची लाख मोलाचे  आत्मिक बाळ वाढवले असे  भावपूर्ण मनोगत महासैनिक दरबार येथील सैनिक कल्याण अधिकारी मेजर शिवाजीराव पोवार यांनी व्यक्त केले. 
एक राखी सीमेवरील जवानांसाठी ‘ या देशरक्षाबंधन उपक्रमांतर्गत जमा झालेल्या राख्या प्रदान कार्यक्रम ‘ श्री . स्वामी विवेकानंद चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने ”  जमा झालेल्या राख्या प्रदान करणेचा कार्यक्रम आज रोजी कसबा बावडा परिसरातील  महा सैनिक दरबार हॉल येथे देश भक्तिमय वातावरणात  संपन्न झाला. प्रारंभी सर्वांचे स्वागत आपल्या प्रस्थाविकात श्री . स्वामी विवेकानंद चॅरीटेबल ट्रस्टचे  सचिव राजेंद्र मकोटे यांनी करताना कारगिल युद्धापासून फक्त युद्धावेळी नव्हेतर वर्षभर चोवीस तास जीवावर उदार होऊन देश रक्षण करत असलेल्या जवानांना अभिवादन करणारा हा पारंपरिक बंधुभगिनींच्या रक्षाबंधनाला देश भक्तीचा दिलेला व्यापक आयाम हा आता एक लोक चळवळ बनत असून शालेय मूल्य शिक्षण अंर्तगत त्याचे आता सर्वत्र व्यापक अनुकरण होत असल्याचे नमूद केले. तर अध्यक्ष किशोर घाटगे यांनी कोल्हापूरहून देशाच्या विविध सिमेवर लढणाऱ्या जवानांना मिळणाऱ्या राख्या या कोल्हापूरची विधायकता देश भक्तीतून राखीच्या धाग्याने व्यक्त होत असल्याचे नमुद केले. या सोहळ्यास उपस्थित प्रमुख पाहुणे  मा . सुभेदार मेजर एन . एन . पाटील ( सांगवडेकर ) सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी कॅप्टन अशोक पोवार, कॅप्टन शिवाजीराव पोवार, टिटवे येथील शाहिद शिक्षण समूहाच्या वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील , माजी नगरसेविका माधुरी नकाते , माजी परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तूरे  संपादिका कल्पिता कुंभार ,आदर्श करिअर ॲकॅडमीचे अंकुश टिकले,रोटरी क्लब कोल्हापूर रॉयलच्या सविता पाटील,कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग असलेले जवान जोतिबा गावडे, सुनील चौगुले,उमेश पाटील आदी मान्यवरांचे स्वागत विवेकानंद ट्रस्ट चे विश्वस्त पत्रकार दीपक घाटगे ,कमलाकर किलकिले,उमेश निरंकारी,युवराज जाधव,डॉ. सायली कचरे,सीमा मकोटे,महेश कामात आदी नी पुष्यगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन  केले. 
यावेळी जयभारत हायस्कुल च्या अश्विनी पाटील,रोटरी क्लब च्या वारणा वडगावकर,एन सी सी मेजर सरोज यादव आदींनी आपली मनोगत व्यक्त करत भविष्यात हा देश रक्षाबंधनाचा सोहळा अधिक व्यापकपणे  करण्याचा निर्धार व्यक्त केला. 
यावेळी भावना व्यक्त करताना वीरमाता लक्ष्मीबाई सीताराम पाटील यांनी १९७१ च्या युद्धात आपल्या पतीस आलेले वीरमरण, त्यानंतर पार पाडलेली  मातृत्वाची जबाबदारी ते टिटवे येथील शाहिद शिक्षण संस्थांचा प्रवास भावुकतेने कथन केला. यावेळी सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात जयहिंद चा नारा देत त्यांना अभिवादन केले. तर अध्यक्षीय समारोपात निवृत्त सुभेदार एन एन पाटील यांनी देश रक्षाबंधन हा सलग २३ वर्ष सुरु असलेला हा उपक्रम समस्त सैनिकांसाठी प्रेरणादायी असाच ठरला असून भविष्यात त्याची   व्यापकता  वाढावी अशा शब्दात आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
 यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थांच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलच्या कलाशिक्षक सुनीता मेंगाणे तसेच जेष्ठ विश्वस्थ  मालोजी   केरकर  तसेच देश भक्तिपर गीते सादर करणाऱ्या  जय भारत हायस्कूल रुईकर कॉलनी, डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिर , कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हापूर , च्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या सह शिवसमर्थ जॉईन ग्रुप, सकाळ तनिष्का ग्रुप ,बाळासाहेब पाटील हायस्कुल आळते,जायंट्स क्लबसह शाळा ,महिला बचत गट सहभागी झाले होते.  श्रावणाच्या उत्साही वातावरणात कारगिल युद्धात सहभागी जवान निवृत्त्त सैनिक,अधिकारी ,वीरमाता ,विध्यार्थी शिक्षक वर्गाच्या सहभागाने देश भक्तीचा धागा झाला अधिक दृढ करणारा असा हा देशभक्तिपर सोहळा संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!