मुंबई

ए. एम. (आर्ट टिचर) अहर्ता प्राप्त केलेल्या कला शिक्षकांना वेतन श्रेणी ; शिक्षक भारती संघटनेचा यशस्वी पाठपुरावा.

ए. एम. (आर्ट टिचर) अहर्ता प्राप्त केलेल्या कला शिक्षकांना वेतन श्रेणी ; शिक्षक भारती संघटनेचा यशस्वी पाठपुरावा.
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
शिक्षक भारती संघटने सेवेत असताना चित्रकला शिक्षकांनी ए.एम.(आर्ट मास्टर) शैक्षणिक पात्रता मिळवल्यास त्यांना ए.एम. वेतनश्रेणी मिळाली पाहिजे अशी मागणी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे केली होती. शिक्षक भारतीची मागणी मंजूर करण्यात आल्याने हजारो ए.एम. शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

शासन निर्णयानुसार माध्यमिक शाळेतील कला शिक्षकांचा (आर्ट टीचर) महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील ‘फ’ सूचीच्या ‘क’ संवर्गात अंतर्भाव करण्याबाबतचा शासन निर्णय 25 नोव्हेंबर 1988 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. शासनाच्या पत्रकानुसार चित्रकला शिक्षकांनी सेवेत असताना शैक्षणिक अहर्ता ए.एम. (आर्ट मास्टर) प्राप्त केली आहे त्यांना वेतनश्रेणी मिळाली पाहिजे. काही शाळामार्फत ए.एम. वेतनश्रेणी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविले जात नाहीत कारण शिक्षण निरिक्षक कार्यालयाचे प्रस्ताव पाठवण्याबाबत स्पष्ट आदेशच नाहीत. राज्यात सातारा, सांगली कोल्हापूर, नाशिक इत्यादी जिल्ह्यात सदर प्रस्ताव सादर करण्याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि शिक्षणाधिकारी यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत. संस्था ठरावासह ए.एम. वेतनश्रेणीचे प्रस्ताव दाखल न झाल्याने अनेक शिक्षक वेतनश्रेणीपासून वंचित आहेत.
शिक्षक भारती संघटनेने शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे केलेल्या मागणीनुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ए.एम. वेतनश्रेणीचे प्रस्ताव सादर करणेबाबत मुबंईतील उत्तर, दक्षिण आणि पश्चिम शिक्षण निरीक्षकांना आणि ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांना पत्र काढण्याचे आदेश दिले आहेत, असेही सुभाष मोरे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!