ॲड.पंडितराव सडोलीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांन कडून अभिवादन

ॲड.पंडितराव सडोलीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांन कडून अभिवादन
कोल्हापूर, दि.४ (प्रतिनिधी) कोल्हापूर क्रिमिनल बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष रि.पा.ई. (आ) चे माजी प्रदेश सचिव, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.पंडितराव सडोलीकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन व विविध पक्ष संघटनांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त गरजू लोकांना शाहू स्मारक येथे कोल्हापूर थाळी चे वाटप महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य अॅड.विवेक घाडगे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश खडके, ॲड. विजय ताटे देशमुख, अॅड. सी.व्ही. पाटील, ॲड.अमर पवार, ॲड.काळे,अॅड. तुषार कोडोलीकर, अॅड. तेजस्वनी कासे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन अॅड.राहूल सडोलीकर यांनी केले होते.
यावेळी रि.पा.ई.चे प्रदेश सचिव बी.के. कांबळे, रि.पा.ई.चे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मिसाळ, परिवर्तन चे अमोल कुरणे, युवा नेते अमित काळे,डॉ.किशोर सडोलीकर, कोल्हापुरी थाळी चे व्यवस्थापक उदय प्रभावळे,तुकाराम परीट,पृथ्वीराज कडोलकर,चंदू दिंडे आदी उपस्थित होते.