कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा गटप्रवर्तक महिलांच्या संघटनेकडून कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळी यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन.


.

कोल्हापूर जिल्हा गटप्रवर्तक महिलांच्या संघटनेकडून कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळी यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन.
राज्य पातळीवरील मागण्या मंजूर होण्यासाठी 18 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर आशा व गटप्रवर्तक महिला जोरदार आंदोलन करणार
शिष्टमंडळाच्या वतीने दिलेले निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळी यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी लक्षात ठेवावे की, ज्या कामाचा मोबदला दिला जात नाही असे कोणतेही काम आशा व गटप्रवर्तक महिलांच्या कडून करण्यात येऊ नये. असे काम कोणी सांगितल्यास डायरेक्ट जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळवावे. कारण आयटक कामगार संघटनेच्या वतीने एन एच एम अभियान संचालक यांना नेमून दिलेल्या कामाच्या व्यतिरिक्त व ज्या कामाचा मोबदला मिळत नाही असे काम आरोग्य अधिकारी यांनी करून घेऊ नये असे निवेदन दिले होते. या निवेदनावर एन एच एम चे अभियान संचालक यांनी आदेश काढलेले आहेत की ज्या कामाचा मोबदला मिळत नाही असे काम सांगितल्यास त्याबाबत अश्या आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.
शिष्टमंडळाच्या वतीने बोलताना महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक युनियनचे अध्यक्ष कॉमेडी शंकर पुजारी यांनी सांगितले की, गटप्रवर्तक महिलांना वीस गावांमध्ये सर्वे व तपासणी करीत असताना सह्या घेण्याची सक्ती केली जाते अशा सह्या देण्यास काही कर्मचारी नकार देतात याबाबतचा अन्याय दूर केला पाहिजे असे सांगितले. गटप्रवर्तक महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये स्वतंत्र बसण्याची व्यवस्था सुद्धा नाही हे ऐकून जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आश्चर्य वाटले त्यांनी सांगितले की गटप्रवर्तक महिलांना स्वतंत्रपणे बसण्याची जागा मिळालीच पाहिजे याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये याबद्दल सूचना देण्यात येतील. तसेच गटप्रवर्तक महिलांना त्यांना नेमून दिलेल्या कामासंदर्भात ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत ठराविक वेळ संगणक गटप्रवर्तकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्याबाबत ही सूचना देण्यात येतील असे त्यांनी आश्वासन दिले.
एप्रिल 2022 पासून जे थकीत मानधन आहे ते थकित मानधन शक्य असेल तितक्या लवकर काढण्यात येऊन आशा व गटप्रवर्तक महिलांना देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर जिल्हा परिषद आवारामध्ये संघटनेच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे हा निर्णय होईपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तरी सर्व लाभ गटप्रवर्तक महिलांना मिळाले पाहिजेत या प्रमुख मागणीसाठी 18 ऑगस्ट 2022 रोजी कोल्हापूर जिल्हा परिषद समोर सकाळी 11 वाजता निदर्शने करण्यात येतील.
शिष्टमंडळामध्ये कॉ शंकर पुजारी. वनिता कोंगे, पूजा लाड, अनुजा माळी, जयश्री सातपुते, लीला कोकरे ,माधुरी गायकवाड ,संगीता पाटील, वैशाली मंजलेकर ,निता बेले, विजया पवार, रत्ना तोडकर इत्यादी सर्व गटप्रवर्तकांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!