महाराष्ट्र

अभिव्यक्ती स्वातंत्र्य व सांस्कृतिक क्षेत्रातील उभा केला जाणार
संघर्ष. टाळायला हवा

///अभिव्यक्ती स्वातंत्र्य व सांस्कृतिक क्षेत्रातील उभा केला जाणार
संघर्ष. टाळायला हवा ///

चित्रकार
रविकिरण पवार नागठाणे याचे कथन
(( प्रकट मुलाखत ))
धर्म आणि चित्रकला हे मुळात वेगळे असायला हवेत पण धर्माने चित्रकलेचा प्रतीकांच्या साठी जो वापर केला ते राजकारण होते का चित्रकलेचा विकास होता हे निश्चित ठरत नाही चित्रकाराने धर्माचा वापर केला चित्रकार आणि धर्म मार्तंड एकच होते आजही ते एकच आहेत काय त्यामुळे धर्मातील देवदेवतांच्या प्रतिकांचा चित्र अविष्कार त्याबद्दलची चिकित्सा त्याबद्दलची अभिव्यक्ती ही नेहमी टिकेचा विषय बनते संघर्षाची कारणे बनते आणि समाजामध्ये असंतोष उफाळून येतो हे सर्व कालखंडामध्ये चालू आहे भारताच्या 2022 च्या या स्वस्त कला जीवनात देवदेवतांचा श्रद्धावाद आणि निंदा वाद हा एकमेकांच्या समोर शत्रु भावाच्या स्वरूपात उभा आहे निंदा कशाला म्हणायची परत देवदेवतांच्या प्रतिकार बद्दल मत व्यक्त करायची किंवा नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे नेहमी निंदेच्या क्षेत्रात आणून ते बंदिस्त करण्याचे कुटील राजकारण धर्म मार्तंडवादी लोक आणि संघटना हे करीत असतात आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य हीनेहमी नियंत्रित केली जाते आहे अशा कालखंडामध्ये नव्या पिढीतील प्रतिभावंत चित्रकार हा कोणता विचार करतात हे समजावून घेणे हे खूप महत्त्वाचे ठरते

छत्तीसगड राज्यातील इंदिरा कला विश्वविद्यालयातून मास्टर इन फाई न आर्ट मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणारा नागठाणे येथील रविकिरण पवार हा 26 वर्ष वयाचा युवक हा अस्वस्थ चित्रकार आहे नग्नता विभस्तता शोषण जातीव्यवस्था अत्याचार हे त्याच्या चित्राचे विषय आहेत तो सौंदर्याच्या संकल्पनेचा विरोधक आहे त्याचे सौंदर्य विचार हे मूल्य संचय स्वरूपाच्या आहेत कला विश्वामध्ये शोषण दुःख मोब लिंचींग भंगीकाम भारतीय संविधान फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा शेतकरी आणि कामगारांच्या चळवळी हे विषय खूपच कमी प्रमाणामध्ये हाताळले जातात
रविकिरण पवार हा नुकताच भारतीय मुद्रास्फिती विभागामध्ये लिथोग्राफीचा चित्रकार म्हणून वर्ग एक दोनचा अधिकारी म्हणून निवडला गेला आहे तब्बल एका दशकाची बेकारी भोगून कला मुसाफिरी करीतभटकत फिर णारा हा रविकिरण पवार हा चित्रकार याचे शी झालेलां संवाद

प्रश्न भारतीय कला विश्वाचा प्रवास सध्या कसा चालू आहे कोणते फॉर्म्स गाजत आहेत याबद्दल आपले मत काय?
उत्तर भारतीय कला परंपरेमध्ये राजाश्रयित्व धर्मश्रीत कला चालत आली आहे भारतीय कलेमध्ये सृजनाच्या पातळीवर वाद झालेले नाहीत पाश्चात्य कला इतिहास हा विकसित आहे भारतीय कलाविकास व इतिहास हा धर्माच्या अंगाने पुढे आला आहे यामध्ये कलाक्षेत्रातील विविध प्रकार म्हणून चिकित्सा आणि वाद झालेले नाहीत परंपरेचे संकेत कलाक्षेत्रातील मोडण्याचे काम पाश्चात्य कला इतिहासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाले आहे संरचना अनुभवात वास्तव चित्रण अमूर्त चित्रे सरचना चित्रे निसर्ग चित्रे या सर्व फॉर्ममध्ये सतत संघर्ष वाद हे पाश्चात्य चित्रकलेच्या इतिहासाचे वैशिष्ट्य आहे त्यामुळे प्रत्येक वादात पाश्चात्य चित्रकला अडकली नाही
भारतीय राजेशाहीच्या कालखंडात राजांना आवडणारी चित्रे रेखाटणारे चित्रकार आणि धर्म देवतांच्या साठी चितारलेली राजा रविवर्मापासूनचे असंख्य चित्रे आणि ती परंपरा हा भारतीय चित्रकलेचा समृद्ध वारसा मी मानत नाही
प्रश्न मानवी शरीराची रेखाटने नग्नतेच्या अंगाने सर्व चित्रे हि काळया रंगांमध्ये चित्रे रेखाटन्याचे कारण काय?
उत्तर सभोवताली समाजात अनुभवला येणारे दुःखाचे अनुभव खूप आहेत दुःखही निराशा आहे वास्तव आहे दुःख उदवेग आहे दुःख टाळता येत नाही शाश्वत आहे दुःखाचे चक्र या जाती व्यवस्थेने सतत फिरवत पुढे चालवले आहे त्यामुळे मला वास्तवातील वेदना आक्रोश शोषण हे जातीव्यवस्थेचे परिणाम सर्वांना जे भोगावे लागतात त्याचा मी बळी आहे त्यामुळे मी खोटे सौंदर्य कलानंद हा चीतारू शकत नाही जे समोर आहे जे सभोवताली आहे ते रेखाटने हे माझे काम आहे दुःख वेदना अत्याचार हा चित्रातून दाखवला तर समाजाची वेदना सर्वदूर पोहोचेल चित्राने नेहमी सौंदर्य अनुभूतीच द्यावी असे अभिप्रेत नाही म्हणून माझ्या चित्रांमध्ये शरीर भावाची वास्तव नग्नता जी सहज आहे ते अश्लील नाही म्हणून मी अशी चित्रे रेखाटतो माझ्या सर्व चित्रातील व्यक्तिरेखांचे रंग हे काळे आहेत याचे कारण माझ्या अंतकरणात दाटलेला दुःखाचा अंधार साठलेली कटूता ही काळयारंगातून नैराश्याचे प्रतीक म्हणून शोषित आणि बळी गेलेले घटक म्हणून त्या रंगातून अभिव्यक्त झाले आहेत हाच हेतू काळा रंग सतत वापरण्याचा आहे असे रविकिरण सांगतात

प्रश्न. जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई मधून अर्धवट शिक्षण सोडून छत्तीसगडच्या कला विश्वविद्यालयात का जावे लागले?
उत्तर भारतात सर्व क्षेत्रातील घृणास्पद अनुभवास येणारा जातीयवाद आहे शेवटच्या वर्षाला असताना संशोधन प्रकल्पाचे एक चित्र सादर करताना खालून थ्री फोर्थ हा मानवी शरीराचा दाखवल्यामुळे विद्यापीठ व महाविद्यालयाने गुणदान दिले नाही आणि अनुत्तीर्ण व्हावे लागले आणि त्यातून महाराष्ट्र सोडून परत जात जाऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करावे लागले हा प्रवास कुटील राजकारणाचा जातीवादाचा बळी असलेला मी आहे म्हणून तो मला अनुभव आला त्यातूनच खरे तर फार जुन्या असलेल्या विश्वविद्यालयात तून मला लिथोग्राफी हा विषय घेऊन पदवी तर शिक्षण पूर्ण करता आले कलाक्षेत्रातला व्यापक दृष्टिकोन प्राप्त झाला छत्तीसगडच्या आदिवासी संस्कृतीतील प्राचीनता कलावाद्य यांची ओळख झाली पण आधुनिक कलाप्रकारांचा चर्चा विश्वाचा अनुभव तेथे आला नाही त्यामुळे व्यापक विकसित दृष्टिकोनासाठी छत्तीसगडच्या कलाशिक्षणातील कालखंड खूप वेगळे शिक्षण देवून गेला मला ते घेता आले असेच मी मानतो
प्रश्न कला ही प्रचारकी असता कामा नये असे म्हटले जाते असे असूनही सामाजिक विषय हे चित्रकलेचे विषय बनवण्यातून संदेश पोहोचवण्यात आपण यशस्वी होताकाय?
उत्तर
कलेने समाजाच्या दुःखाचा पंचनामा करू नये दुःख रेखाटू नये अत्याचार दाखवू नये शोषण दाखवू नये हे करे बद्दलचे निर्बंध यामध्ये राजकारण आहे म्हणून मी मात्र माझ्या कला विषयांची निवड करताना शेतकरी कामगार यांच्या आंदोलनाची विषय निवडतो मी असे काम करणाऱ्या कामगारांचा विषय निवडतो ते सुद्धा भारताचे हुतात्मे आहेत हे दाखवण्याचा माझा अट्टाहास असतो सीमेवर लढणारा फक्त हुतात्मा नाही तर गाव शहरा शहरातून स्वच्छता करताना विषारी वायू ने मरण पत्करणारा माझा भारतीय बांधव हा शहीद हुतात्मा आहे हा दृष्टिकोन कलेतून लोकांच्या पर्यंत रुजवण्यासाठी मी असे विषय निवडतो माझ्या चित्रकलेला प्रचार की चळवळीची चित्रकला म्हटलं तरी मला काही एक त्याबद्दल दुःख वाटत नाही कारण माझ्या दोन चित्रातून दोन व्यक्तींच्या सहवेदना जाग्या झाल्या तर निरंतर चाललेले दुःख शोषण रोखण्यासाठी कृतीशील हात तयार होतील आणि बदल होऊ शकेल असे मला वाटते म्हणून मी सामाजिक विषयांचे विषय चित्राचे विषय बनवतो हा माझा एकारलेपणा असला तरी मला त्याची फिकीर वाटत नाही

प्रश्न चित्रकला ही प्रदर्शनीय कला आहे ही प्रशंशा कला आहे पण तळातील चित्रकारांच्या अनमोल चित्रां ची समीक्षा का होत नाही?
उत्तर कलाक्षेत्रातील निंदनीय राजकारण आणि विशिष्ट वर्गाचे प्रभुत्व आणि त्यांचीच केली जाणारी समीक्षा आणि त्यांचेच समीक्षक हे भारतीय चित्रकलेतले धूर्त राजकारण सतत चालू आहे त्यामुळे आमच्यासारख्या नव्या चित्रकारांच्या एका दशकाचा चित्रकलेचा प्रवास याची दखल कोणालाही घ्यावीशी वाटत नाही त्याची फिकीर आम्हालाही वाटत नाही कोणी आम्हाला चित्रकार म्हणावे म्हणून आम्ही चित्रे काढत नाही आम्ही आमच्यातील अस्वस्थता आमच्यातील वेदना आमच्या अंतकरणातील क्रोध आणि आक्रोश हा चित्रातून अभिव्यक्त व्हावा त्यातून समाजाला दुःखाचे चक्र सतत कसे चालू आहे ते कोण चालवते हे कळावे तेवढाच सेमीत हेतू चित्र काढण्याचा आहे म्हणून अशी चित्रे मी रेखाटली आहेत

प्रश्न तळातून येऊन कलाक्षेत्रात पुढे जाण्याची आंतरिक ऊर्मी कुठून प्राप्त झाली. याबद्दल काय सांगाल?

उत्तर. नागठाणे येथील अनेक प्रकारची कामे करून उभे राहिलेले बाळू पवार हे माझे वडील मला मुंबईला भेटायला येताना कधी खाऊन आणता वेगवेगळे ब्रश मला त्या आणून देत असत त्यांच्या अंतकरणात माझा मुलगा हा चित्रकार व्हावा त्यासाठी कितीही त्रास झाला पैसे खर्च झाले तरी त्याला चित्रकार बनवावे त्यांच्या आंतरिक इच्छाच्या महत्त्वकांक्षा पूर्ण करण्याचे काम माझ्या कलाक्षेत्रातील प्रवासातून होत आहे असेच मला वाटते मला मिळालेली प्रेरणा व जिद्द ही वडील आणि चित्रकला शिक्षक कांबळे यांच्याकडून मिळाली आहे आणि जेजे स्कूल ऑफ आर्ट येथील कलाक्षेत्रातील अंतरंगातील कळत गेलेले व्यापक दुष्ट राजकारण त्यावरून करावयाची मात हीच माझी वाटचाल आहे त्यातून मी कलाक्षेत्रातील मास्टर इन फाईन आर्ट ही पदवी प्राप्त केली आहे

प्रश्न भारतीय संविधान हा विषय घेऊन अनेक चित्रे रेखाटनेचे हेतू काय आहेत?
उत्तर सध्या भगव्याचे भारतीय संविधान डळमळीत करण्याचे अप्रत्यक्ष प्रयत्न चालू आहेत संविधान ही समानता आहे संविधान ही शोषण मुक्ती आहे संविधाना जगण्याचा अधिकार आहे संविधान याविष्कार स्वातंत्र्य आहे संविधान हे मानव याचे प्रस्थापन आहे संविधान ही राष्ट्रीय एकात्मता आहे हे विचार संविधानाच्या साक्षरतेसाठी पोहोचले पाहिजेत म्हणून संविधान बचाव देश बचाव संविधान बचाव मानव बचाव हा संदेश देणारी चित्रे मी प्रचारक चित्रकार म्हणून आरोप जरी झाला तरीही जाणीवपूर्वक मी ही चित्रे विचारधारेचा कार्यकर्ता म्हणून मीही रेखाटले आहेत आणि ते माझे चित्रकार म्हणून आद्य कर्तव्य आहे मी वादाच्या पलीकडे विचारसरणीच्या पलीकडे निरुपयोगी चित्रकार नाही तर सामाजिक दुःख आणि चळवळीतील संघर्ष मांडणारा चित्रकार आहे याचा मला अभिमान आहे मी सौंदर्य वास्तव निसर्ग या भुलभुलय्यात अडकवणाऱ्या चित्रकरांना चित्रकार मानत नाही

प्रश्न चित्रकला हे प्रबोधनाचे यशस्वी व प्रभावी हत्यार हे समाजमान्य माध्यमामुळे जरी असले तरीही तंत्रज्ञानाच्या हस्तक्षेपामुळे चित्रकला विश्व हे नेहमी डळमळीत होत राहणार आहे याबद्दल आपले मत काय?

उत्तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये सतत असत्य पुढे येते आहे अत्याचार व शोषण करणारे लोक व मालक हे अदृश्य राहत आहेत अभिजात कला निर्माण केली तिच्या पेक्षाही तंत्रज्ञानाच्या उचलेगिरीतून अभिजात चित्रकार हा उपेक्षित राहतो आहे आणि सर्व दूर पोहोचणारी पोचवली जाणारी दुय्यमतियम दर्जाची कला ही श्रेष्ठ म्हणून सुद्धा मिरवले जाते लादली जाते ती विकली जाते खरेदी केली जाते आहे या सगळ्या समस्या टाळता येत नाहीत यासाठी कला साक्षरता व कले मधील दुष्ट राजकारण हे प्रेक्षकांच्या मध्ये आस्वादकांच्या मध्ये निरीक्षकांच्या मध्ये रुजवण्याची नितांत गरज आहे सर्व ज्ञान क्षेत्राचा पराभव हा प्रबोधनाच्या अभावातून होतो तसेच कलाक्षेत्राचे होत आहे आगामी दशक हे चित्र साक्षरतेच्या पुढे जाणारे अर्थ आणि विश्लेषण करणारे व ज्ञानाच्या नव ं आकलण्याचे असणार आहे असा मला विश्वास वाटतो

प्रश्न भारतीय वर्तमानकालीन चित्रकला क्षेत्रातील चर्चा विश्व काय सूचित करते याबद्दल काय सांगता येईल?

उत्तर भारतातील धर्मवादी संघ विचाराचे वातावरण वाढत चालले आहे त्यांच्या हातात विविध सत्तेची ठिकाणे आहेत त्यामुळे कलाक्षेत्रातील विरोधकांचे विषय निवडून अल्पसंख्यांक मुस्लिम राजकारणी विरोधक यांनी व्यक्त केलेली मते व भूमिका यांना टीकेचा विषय बनवून अस्मिता दुखावल्या देव देवतांचा अपमान झाला अशा प्रकार चा असंतोष ठरवून तयार करण्याचे पेटवण्याचे प्रयत्न चालू आहेत ही दुःखदायक गोष्ट आहे कला ही राजा श्रेयाने पुढे जाते सत्ताधारी हेच जर कलेचा राजकारणातील संघर्ष पेटवण्यासाठी समाज दुभंगविण्यासाठी प्रयत्न करणार असतील तर निरपेक्ष कला निर्माण कार्य व कलासवादक ता आणि कला साक्षरता ही भारतात पुढे जाणे असंभव आहे असे माझे मत आहे
सामाजिक अत्याचार अन्याय शोषण कामगार शेतकरी यांची दुःखे हे कला क्षेत्राचे विषय सतत असायला हवेत हे दुःखाचे पर्यावरण नाकारून कलेचा भ्रमवाद पुढे नेणे म्हणजे अप्रत्यक्षपणे अत्याचाराचे सामील घटक चित्रकार आहेत असे माझे मत आहे म्हणून दुःखाचे चालवलेले चक्र थांबवण्यासाठी सर्व ज्ञान शाखांनी कलाक्षेत्रांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे मी एका दशकाच्या प्रवासातील चित्रकार आहे माझा सगळाच कला प्रवास हा दुःख दाहकतेने दाखवून देणे शोषण दाखवून देणे हा आहे यातूनच व्यापक जाणीवा विकसित होतात समाज बदलाला हे सामाजिक कला पर्यावरण उपयुक्त ठरेल असा माझा आशावाद आहे तोच माझा कला प्रवास आहे हा माझा ठाम विश्वास आहे मला खूप कला प्रवासाचे टप्पे गाठायचे आहेत चित्र रेखाटावयाची आहेत परंतु नग्नता आणि देव देवतांचा प्रतीक वाद यांच्यातील चित्रे आणि त्यातून पेटला जाणारा संघर्ष त्यामुळे भारतीय कला जगत हे भेग्रस्त आहे तसाच मीही एक तळातील चित्रकार अस्वस्थ कलाभान घेऊन जीवनाची चित्रकला मुशाहिरी करण्यासाठी पुढे निघालो आहे एवढेच मला एम एफ हुसेन सारख्या सर्व संकेत नाकारणाऱ्या वाटा स्वीकारायचया आहेत व हुसेनच्या दुःख त्यांचा सांस्कृतिक कला राजकारण संघर्ष व आव्हाने समजावून घेत अभ्यास करीत सुर र्जन प्रतिभा विकसित करीत स्थिर होत पुढे जायचे आहे प्रवास खूप आहे टप्पे मोठे आहेत पण माझ्यात अस्वस्थ सामाजिक भान ठेवून कला प्रवास व्यवस्था बदला साठी करण्याची जिद्द आहे येवढे निश्चित सांगू शकतो

संवादक रविकिरण पवार अस्वस्थता बाळगणे व कलाक्षेत्रातील व्यक्तिमत्व विकास हे करीत राहणे हेच उद्याचे उज्ज्जवल भविष्य आहे कला प्रवासाला शुभेच्छा

शिवाजी
राऊत. चित्र समीक्षक 94230 32256
सातारा 2 आगस्त 22 वेळ साय 6.15

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!