कोल्हापूर
भादवण शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी सौ प्रियांका दिवेकर एकमताने निवड

भादवण शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी सौ प्रियांका दिवेकर एकमताने निवड
गुडाळ प्रतिनिधी, संभाजी कांबळे
भादवण तालुका आजरा येथील आदर्श विद्यामंदिर या प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी सौ प्रियांका बाळासाहेब दिवेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
सौ. दिवेकर या अध्यापक बाळासाहेब दिवेकर यांच्या पत्नी असून सिंधुदुर्ग पोलीस दलातील नंदकुमार रेडेकर यांच्या भगिनी आहेत.
शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेला मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही सौ. प्रियांका दिवेकर यांनी निवडीप्रसंगी दिली.