महाराष्ट्र

अदानी (इंधन) समायोजन आकाराचा जबरदस्त दणका
सर्व वीजग्राहकांवर २०% वाढ – प्रताप होगाडे


अदानी (इंधन) समायोजन आकाराचा जबरदस्त दणका
सर्व वीजग्राहकांवर २०% वाढ – प्रताप होगाडे

इचलकरंजी दि. २५ – “राज्यातील घरगुती, व्यापारी, शेतकरी, औद्योगिक व अन्य सर्व २.८७ कोटी ग्राहकांवर जुलै २०२२ मध्ये मिळालेल्या बिलापासून ५ महिन्यासाठी अदानी (इंधन) समायोजन आकार या नावाखाली थेट वीज आकाराच्या २०% दरवाढ लागू करण्यात आली आहे. याशिवाय थकीत इंधन समायोजन आकार १२२६ कोटी रू., अदानीचे राहीलेले देणे ७७०९ कोटी रू. व समान करार असलेल्या रतन इंडियाचे देणे हा बोजा डिसेबर २०२२ पासून लागू होण्याची शक्‍यता आहे.” अशी माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना अध्यक्ष व वीज तज्ञ प्रताप होगाडे यांनी जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे…

त्याशिवाय महावितरण कंपनी सप्टेंबर २०२२ नंतर मध्यावधी फेरआढावा याचिका दाखल करणार हे निश्‍चित आहे. या याचिकेद्वारे २ वर्षांचा कोरोना काळातील घाटा व खर्चातील वाढ या नावाखाली पुन्हा २०,००० कोटी रू. व अधिक वाढ मागणीची शक्‍यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी आजच जागरूकतेने या दरवाढीस विरोध करणे व शासनाने हस्तक्षेप करावा यासाठी चळवळ व आंदोलन करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यस्तरीय समन्वय समितीने दि. ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या आठवड्यात राज्यात सर्वत्र जिल्हा, विभाग वा तालुका स्तरावर आंदोलन जाहीर केलेले आहे…

कोणत्याही वर्गातील ग्राहकांना न परवडणारी व न झेपणारी ही दरवाढ सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे आहे…


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!