महाराष्ट्र

नवीनतम मान्सून अंदाजानुसार आजपासून पाच दिवस पुन्हा पावसाचा जोर

नवीनतम मान्सून अंदाजानुसार आजपासून पाच दिवस पुन्हा पावसाचा जोर

पूर्व विदर्भात सर्वाधिक पाऊस कोसळणार असल्यामुळे शेतक-यांच्या डोकेदुखीत वाढ

राज्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर ओसरला आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून सूर्यदेवाचे दर्शन देखील घडतं आहे. मात्र, राज्यात १० जुलैपासून ते १५ जुलैपर्यंत खूपचं पाऊस पडला होता.

या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांच्या खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. यामुळे राज्यातील बहुतांशी भागातील शेतक-यांना पुन्हा एकदा दुबार पेरणी करावी लागणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

शिवाय खरीप हंगामातील पिकांसाठी केलेली मेहनत देखील वाया जाणार आहे. एवढेच नाही तर आता खरीप हंगामात दुबार पेरणी केल्यास पिकं काढणीसाठी देखील उशीर होणार आहे. मात्र, आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा नव्या जोमाने शेतीकामासाठी लागला आहे.

दरम्यान, आपल्या अचूक हवामान अंदाजासाठी महाराष्ट्रातील शेतक-यांमध्ये विश्वासाचे नाव म्हणून ओळखले जाणारे परभणी भूमिपुत्र पंजाबराव डख यांचा नवीनतम मान्सून अंदाज जाहीर करण्यात आला आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या नवीनतम सुधारित मान्सून अंदाजानुसार आज पासून राज्यातील हवामानात मोठा बदल घडून येणार आहे. आज 17 जुलै पासून राज्यात पुन्हा एकदा मोसमी पावसाचा जोर वाढणार आहे.

17 जुलैपासून ते 21 जुलैपर्यंत राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे. मात्र, या कालावधीत राज्यात सर्वदूर पाऊस नसणार आहे. म्हणजेच 17 जुलै ते 21 जुलै दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस कोसळणार आहे.

या कालावधीत सर्वाधिक पूर्व विदर्भात पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबरावं डख यांनी आपल्या सुधारित अंदाजात नमूद केले आहे. निश्चितच गेल्या दोन दिवसापासून पावसाची उघडीप राहिल्याने शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

मात्र, आता पुन्हा एकदा हवामानात बदल झाला असून मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने राज्यातील ठराविक जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार ते अति-मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबराव डख यांनी नमूद केले आहे. दरम्यान, या कालावधीत सूर्यदर्शन देखील होत राहणार आहे.

पंजाबरावांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, निश्चितचं शेतकरी बांधवांच्या काळजाची धडधड पुन्हा एकदा वाढली आहे. दरम्यान, पंजाबराव यांनी शेतकरी बांधवांना खरीप पिकांचा विमा काढून घेण्याचा मोलाचा सल्ला देखील यावेळी जारी केला आहे. निश्चितच पंजाबरावं यांनी वर्तवलेल्या या सुधारित अंदाजामुळे शेतक-यांची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढणार आहे.

   शब्दस्पर्शी- सुनील शिरपुरे
     कमळवेल्ली,यवतमाळ
 भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!