बुलढाणा

येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद मध्ये निळा झेंडा फडकवल्या शिवाय गप्प बसणार नाही:- जिल्हा संघटन मंत्री धिरजभाऊ इंगळे

येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद मध्ये निळा झेंडा फडकवल्या शिवाय गप्प बसणार नाही:- जिल्हा संघटन मंत्री धिरजभाऊ इंगळे

मलकापूर ,
बहुजन समाज पार्टी मलकापुर विधानसभा, जिल्हा कार्यकारणी मिटींग
दि.२९ मे २०२२,रेष्ट हाऊस मलकापुर येथे घेणाऱ्यात आली त्यावेळी प्रभात खिल्लारे यांनी सांगितले की बसपाची विचारधारा सर्व समाज बांधवांना माहित झाली तर या आंदोलनात ते पेटुन उठतील बसपा हा सर्व समाज बांधवाचा ऐकमेव राष्ट्रीय पक्ष आहे.पण अजुन बहुतांश समाज बांधव या विचारथारेपासून दुर आहेत मग हि विचारधारा समजुन सांगण्याची जवाबदारी बसपा पदाधिकारी यांच्या खांद्यावर आहे.तर त्यांनी विधानसभा पिंजुन काढली पाहिजे.बसपाची विचारधारा जनतेत मांडली पाहिजे.जर हि विचारधारा सर्व समाजात पसरली तर सर्व समाज पेटुन उठेल व बसपाच्या बँनरखाली आल्याशिवाय राहणार नाही, त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असे प्रतिपादन बसपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रभात खिल्लारे यांनी केले.
या कार्यक्रमात बसपा बुलडाणा जिल्हाध्यक्ष एँड.डि.एम.भगत, जिल्हा झोन प्रभारी संतोष तायडे व मलकापुर विधानसभे चे इंचार्ज तथा जिल्हा संघटन मंत्री धिरजभाऊ इंगळे यावेळी बोलताना म्हटलं की येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद मध्ये निळा झेंडा फडकवल्या शिवाय गप्प बसणार नाही यावेळी युवा नेते संघर्ष भाऊ सुरडकर,युवा नेते आवेज खान, विधानसभा अध्यक्ष शरद ब्राम्हणे,उपाध्यक्ष म्हनुन सत्यपाल हिवराळे,यांची निवड झाली.माणीक सिरसाठ यांची महासचिव, प्रमोद पठ्ठै कोषाध्यक्ष,गजानन तारपे सचिव,सुभाष पठ्ठे बि.व्हि.एफ संयोजक,नांदुरा शहर अध्यक्षपदी मो.शकील कुरैशी,व मलकापुर शहर अध्यक्षपदी ओवेज खान हफीज खान यांची निवड करण्यात आली. नंतर विधानसभा अध्यह शरद ब्राह्मणे यांनी सुत्रसंचालन केले व शकील भाई यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!