क्राइममनोरंजनमहाराष्ट्र

ED Action On Raj Kundra: शिल्पा शेट्टीच्या घरावर धाडीवर धाडी पडणार; राज कुंद्राच्या अश्लिल सीडींमागे ईडी लागली

बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या मागची शुक्लकाष्ठ काही संपण्याचे नाव घेत नाहीएत. काही महिन्यांपूर्वी तिचा पती राज कुंद्रा अश्लिल चित्रपट बनविण्याच्या आरोपाखाली अडकला आहे. यामुळे तो सध्या तोंड लपवून फिरत असताना आता ईडीने देखील गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांतही गुन्हा दाखल असून गेल्या वर्षी २० जुलैला राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. 

मुंबईतील एका बंगल्यामध्ये राज कुंद्रा पॉर्न फिल्म तयार करत होता. तसेच त्या काही खास अॅपवर प्रसिद्ध करून करोडो रुपये उकळत होता. हा गोरखधंदा काही वर्षे सुरु होता. राज कुंद्राने अनेकांना सिनेमे आणि वेब सिरीजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करत होते. त्यांच्याकडून पॉर्न फिल्ममध्ये काम करवून घेतले जात होते. या पॉर्न फिल्मची शूटिंग मड आयलंड आणि मालाडच्या अक्साजवळ मिळणाऱ्या भाड्याच्या बंगल्यांमध्ये केली जात होती. मुंबई पोलिसांमध्ये या प्रकरणी आधीच गुन्हा नोंद आहे. आता ईडीने पैशांची अफरातफर, परदेशातून झालेले पैशांचे व्यवहार यांची चौकशी करण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे. 

शुटिंगवेळी आरोपी अभिनेत्रींकडून वेगवेगळ्या स्क्रीप्टसाठी शूट करण्यास सांगायचे. त्यांना न्यूड सीनही दिले जायचे. एखाद्या अभिनेत्रीने त्यास नकार दिला तर तिला धमकीही दिली जात होती. तसेच शुटिंगचा खर्च मागितला जात होता. तो काही कोटींत असल्याने या अभिनेत्रींसमोर दुसरा पर्याय राहत नव्हता. या क्लिप एका अॅपवर अपलोड केल्या जात होत्या. त्या पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत होते. 

मुंबई पोलिसांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी धाड टाकली आणि राज कुंद्राला अटक केली. HotShots हे अॅप वापरले जात होते. तपासामध्ये हे अॅप युकेच्या Kenrin चे होते, परंतू ते राज कुंद्राच्या Viaan या कंपनीकडून चालविले जात होते असे आढळले. या दोन्ही कंपन्यांमध्ये करार होता. Kenrin ची मालकी राज कुंद्राच्या जवळच्या व्यक्तीकडे होती, तो ब्रिटनमध्ये राहतो. कुंद्रासह कंपनीचा आयटी हेड हेड रेयान थोरपे याला देखील अटक करण्यात आली होती. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!