महाराष्ट्रमुंबईशैक्षणिक

शिकणे व शिकवणे हाच शिक्षकांचा धर्म ! – स्वप्ना मिश्रा 

शिकणे व शिकवणे हाच 

शिक्षकांचा धर्म ! स्वप्ना मिश्रा 

हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती स्वप्ना मिश्रा मँडम आपल्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर वर्षाच्या निवृत्त झाल्या. हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल ही निवासी शाळा आहे. शाळेतील शिक्षिकेच्या पेशाबरोबरच वसतीगृहातील गृहपाल म्हणून तीस वर्षे सेवा केल्यानंतर विद्यार्थ्यांबरोबर असलेले नाते संपुष्टात येत असल्याची खंत असली तरी शिक्षकी पेशात सतत मुलांशी व त्यांच्या भावविश्वाशी रममाण झाल्याने जीवनाचा खरा आनंद उपभोगता आला असे प्रतिपादन स्वप्ना मिश्रा मँडम यानी आपल्या निरोप समारंभात केले.

शालेय जीवनात विद्यार्थी व शिक्षक सतत नेहमी काहीतरी शिकत असतो म्हणूनच मला शिकायला व शिकवायला आवडते व ही आवड जपण्यासाठी मी सतत कार्यरत राहणार असे सांगितले. कोरोनामुळे आँनलाईन शिक्षण पध्दती विकसित झाली व विद्यार्थ्यांपासून दूर राहूनही मी विद्यार्थ्यांच्या व सहकार्‍यांच्या संपर्कात राहीली तसेच आता पुढील जीवनातही आपल्या सर्वाच्या संपर्कात राहीन असे सांगितले. कोरोनाने आपल्या शिकवले आहे व जीवनातील प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी शिकवत असते,  शिकणे व शिकवणे शिक्षकाचा धर्म आहे व या धर्माचे पालन आपण शिक्षणाच्या मंदिरात, मस्जिद मध्ये व चर्चमध्ये म्हणजेच शाळेत केले पाहिजे असे भावपूर्ण उद्गार स्वप्ना मिश्रा यांनी समारोप प्रसंगी काढले. 

Related Articles

One Comment

  1. I was just searching for this info for a while. After six hours of continuous Googleing, finally I got it in your website. I wonder what’s the lack of Google strategy that don’t rank this kind of informative sites in top of the list. Usually the top sites are full of garbage.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!