कामगार मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी बांधकाम कामगार संघटना समितीची लवकरच बैठक घेउन उर्वरीत बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवण्यात येतील शिष्टमंडळाला दिले आश्वासन

कामगार मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी बांधकाम कामगार संघटना समितीची लवकरच बैठक घेउन उर्वरीत बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवण्यात येतील असे त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
निवेदनामधील मागण्या –
(१) महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत यापूर्वी सुरक्षा साधने व अत्यावश्यक वस्तूंचे संच प्रत्येक नोंदीत कामगारास पुरवलेली आहेत. परंतु ही कामगारांच्या दृष्टीने महत्त्वाची योजना एकतीस मार्च दोन हजार बावीस पासून बंद करण्यात आलेली आहे. ही बांधकाम कामगारांना सुरक्षा साधने अत्यावश्यक वस्तूंचे संच देण्याबाबतची योजना पूर्ववत सत्वर सुरू करावी
(२) सांगली जिल्ह्यातील मिरज येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दोन लाख रुपये अनुदान दिल्यास 160 घरकुले बांधकाम कामगारांना याठिकाणी मिळणार आहेत या साडेदहा लाख रुपये किमतीच्या फ्लॅट साठी सहा लाख रुपये कर्ज मिळवून देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी या प्रकल्पाचे बिल्डर श्री विनायक गोखले यांनी कामगार मंत्र्यांना निवेदन देऊन केली. याबाबतही लवकरच बैठक घेऊन कर्जाबाबतचा विषय सोडण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले.(३) महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे व लाभ देण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्रातील 439 कंत्राटी कामगारांना नियमाप्रमाणे दरमहा एकवीस हजार रुपये किमान वेतन मिळावे अशी मागणी करण्यात आली. याबाबतही निर्णय घेण्यात येईल असे कामगार मंत्र्यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले.
(४)महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत 1 वर्षापूर्वी मार्च 2021 मध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की, नोंदीत बांधकाम कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास असा नोंदीत कामगार कोणत्याही वयाचा असल्यास किंवा त्याचे वय 50 वर्षांपेक्षा कमी असल तरी त्याना सुद्धा दोन लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी . या ठरावास महाराष्ट्र शासनाने त्वरित मंजुरी द्यावी
(५) मागील दिवाळीच्या वेळेस कामगार मंत्री हसनजी मुश्रीफ यांनी नोंदीत बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचे घोषित केले होते. तसेच कोविडच्या काळामध्ये आरोग्यासाठी व रोजगार नसल्याने आर्थिक सहाय्यासाठी एकूण साडेसहा हजार रुपये मंडळाने आर्थिक सहाय्य कामगारांना केली आहे.यानुसार यावर्षी सुद्धा पाच हजार रुपये रक्कम प्रत्येक नोंदीत बांधकाम कामगारना देण्याबाबत सत्वर आदेश करावा .
. कारण सध्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे उपक्रमांमधून जमलेले 13 हजार कोटी रुपये शिल्लक आहेत.
(५) सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी बांधकाम सुरू असते त्या ठीकाणी आस्थापनांच्या दुर्लक्षितमुळे आणि बांधकाम कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. तरी अशा अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या व गंभीर जखमी झालेल्या अशा अनोंदीत बांधकाम कामगारांना सुद्धा कल्याणकारी मंडळाचे स्मार्ट कार्ड काढले नसले तरी पाच लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने पारित करावा.
(६) महाराष्ट्र शासनाने व कामगार मंत्री यांनी पुढाकार घेऊन एक फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून नोंदीत बांधकाम कामगार यांच्या मुलीचा विवाह एक्कावन्न हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत.परंतु ही योजना एकाच मुलीच्या विवाहास आर्थिक सहाय्य देण्याची मर्यादा घातलेली आहे.तरी इतर सर्व योजनेप्रमाणेच नोंदीत बांधकाम कामगारांच्या दोन मुलींच्या विवाहासाठीही 51 हजार रुपये देण्याबाबत आदेश करावा .
(६) सध्या महाराष्ट्रामध्ये कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने केली जात आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र या ऑनलाइन पद्धतीमध्ये अनेक वेळेस सर्वर बंद असतो किंवा मंद गतीने चालतो. त्यामूळे राज्यातील हजारो बांधकाम नोंदीत बांधकाम कामगारांचे नूतनीकरण एक वर्ष झाले तरी अद्याप नूतनीकरण ऑनलाईन अर्ज करूनही अद्याप झालेले नाही.नवीन नोंदणी व लाभ मिळणे यासाठी हजारो कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत. उदा. मागील एक वर्षापासून ज्या कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या वारसांना अंत्यविधीची दहा हजार रुपये रक्कम सुद्धा अद्याप मिळाली नाही. वास्तविक या संदर्भातील अर्ज सहा महिन्याच्या आत निकाली करावेत असे केंद्र सरकारचे आदेश आहेत. तरी ऑनलाईन पद्धतीचे सध्या प्रलंबित असलेले लाखो अर्ज 15 दिवसाच्या आत मंजूर करण्याबाबत आदेश करावेत.
शिष्टमंडळाला मध्ये बांधकम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक कॉम्रेड शंकर पुजारी, ठाणे जिल्हा कामगार संघटनेचे कॉ रमेश जाधव, पालघर जिल्हा कामगार संघटनेचे कॉ सुनील पाटील उस्मानाबाद जिल्ह्य कामगार संघटना श्री अनंत भालेराव, कोल्हापूर जिल्ह्य कामगार संघटना श्री सुहास साका व सातारा जिल्ह्य कामगार संघटना कॉ धनराज कांबळे इत्यादींचा शिष्टमंडळायामध्ये समावेश होता.