आरोग्यकोल्हापूर

कबनूरमध्ये बैतुलमाल फौंडेशन कबनूर व व्हिजन स्प्रिंग दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिराचा शुभारंभ

कबनूरमध्ये बैतुलमाल फौंडेशन कबनूर व व्हिजन स्प्रिंग दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिराचा शुभारंभ
कबनूर- (प्रतिनिधी चंदुलाल फकीर)कबनूर येथील बैतुलमाल फौंडेशन व व्हिजन स्प्रिंग दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुर रोड कबनुर आरबीएल बँक तळ मजला येथील बैतुलमाल फौंडेशनच्या कार्यालयांमध्ये फौंडेशनचे अध्यक्ष अल्ताफ जकाते सर, उपाध्यक्ष डॉक्टर असिफ फकीर, आणि मान्यवरांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी प्रस्तावना मध्ये फौंडेशन विषयी माहिती देताना डॉक्टर असिफ फकीर म्हणाले बैतुलमाल फौंडेशनची स्थापना २०१६ साली बैतुलमाल कमिटी कोल्हापूरचे अध्यक्ष जनाब जाफर बाबा सय्यद (लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर) यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो याचे भान आणि जाण ठेवून सर्व समाज बांधवांनी आपआपल्या परीने गरजूंना मदतीचा हात दिला पाहिजे याकरता मी स्वतः अल्ताफ जकाते सर, जावेद फकीर अल्ताफ मुजावर, चंदुलाल फकीर, मुजम्मिल मुजावर, जावेद इनामदार, महंमद नाकाडे, इस्माईल शेख, करीम मुल्ला इत्यादी समाजसेवेची आवड असणारे आम्ही सर्वजण समाजबांधव एकत्र येऊन या फौंडेशनची स्थापना केली फौंडेशनचे अध्यक्ष म्हणून अल्ताफ जकाते सर, उपाध्यक्ष डॉक्टर असिफ फकीर, सेक्रेटरी म्हणून जावेद इनामदार,जॉईंट सेक्रेटरी म्हणून जावेद फकीर, खजिनदार म्हणून महंमद नाकाडे हे काम पाहतात. फौंडेशन मार्फत शालेय विद्यार्थी करिता करिअर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना वह्या, शालेय बॅगा, डिशनरी आशा शालेय साहित्याचे वाटप, दहावी,बारावी व एमपीएससी परीक्षामध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार,गरीब, गरजू,अनाथ, निराधार अशा ३० कुटुंबांना दरमहा धान्याचे किट वाटप, गरजू १६ कुटुंबांना लग्न कार्यास मदत, कोरो ना काळात ९०० गरजूंना धान्याच्या किटचे वाटप इत्यादी कामे केलेले असून पुढे एमपीएससी करिअर ॲकॅडमी,ऍम्ब्युलन्स,मेडिकल लॅब, व नाममात्र खर्चात ओपीडी हॉस्पिटलची उभारणी करणार असल्याचे सांगितले.
   यानंतर शिबिरास रितसर सुरुवात झाली शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेल्या नागरिकांचे केस पेपर तयार करून एकाच वेळेला पाच ठिकाणी तज्ञ डॉक्टर मार्फत नेत्रतपासणी चे काम सुरू झाले या शिबिराचे  वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण डोळ्याची मोफत तपासणी, चष्मा लागला असल्यास फक्त ६० रुपये मध्ये चष्मा,जवळचा चष्मा लगेच मिळणार लांबचा असेल तर ३० दिवसात दिला जाणार या करता आधार कार्ड किंवा ओळख पत्र व फोन क्रमांक आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले
  हे शिबिर दररोज सकाळी १० ते सायं. ०४ पर्यंत रविवार सोडून महिनाभर याच जागेमध्ये सुरू राहणार असल्याने भागातील जास्तीत जास्त गरजू लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बैतूलमाल फौंडेशनचे अध्यक्ष अल्ताफ जकाते सर यांनी केले.
या शिबिराचा आज रोजी कबनूर परिसरातील २५० ते ३०० स्त्री आणि पुरुष यांची तपासणी करण्यात आली शेवटी आभार मुजम्मिल मुजावर यांनी मानले.

Related Articles

One Comment

  1. Great beat ! I wish to apprentice at the same time as you amend your website, how could i subscribe for a weblog website? The account helped me a applicable deal. I have been a little bit familiar of this your broadcast offered shiny clear idea

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!