रत्नागिरीशैक्षणिक

स्वत:चा व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी पापड, लोणचे आणि मसाले बनविण्याचे मोफत प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी

रत्नागिरी – ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचेमार्फत दिनांक 27/01/2022 ते 05/02/2022 या 10 दिवसांच्या कालावधीत मोफत पापड, लोणचे आणि मसाले बनविण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

प्रशिक्षण हे सलग 10 दिवस असून सकाळी 09:30 ते सायंकाळी 05:30 या वेळेत होईल. एकूण 35 प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे. प्रशिक्षण मोफत असून चहा नाष्टा जेवण आणि निवासाची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली आहे. प्रशिक्षणासाठी 18 ते 45 वयोगटातील रत्नागिरी जिल्यातील दारिद्रय रेषेखालील व्यक्ती किंवा उमेद पुरस्कृत बचत गटातील महिला किंवा त्यांचा कुटुंबातील सदस्य या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.

अर्ज भरण्यासाठी येताना 1 फोटो, आधारकार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, पॅनकार्ड झेरॉक्स, मतदानकार्ड झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स, उमेद पुरस्कृत बचत गटातील महिला किंवा त्यांचा कुटुंबातील सदस्य असल्यास उमेद अभियान यांचेमार्फत देण्यात येणारे शिफारस पत्र, दारिद्रय रेषेखाली नाव असल्यास दारिद्रय रेषेखाली असल्याचा दाखला कार्यालयीन वेळेत खालील पत्त्यावर घेवून येणे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 24/01/2022 पर्यंत सायंकाळी 05 वाजेपर्यंत असेल. अर्ज भरल्यानंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांना फोनद्वारे कळविण्यात येईल. अर्ज भरण्याचा आणि प्रशिक्षणाचा पत्ता – स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, अष्टविनायक सोसायटीच्या बाजूला, साई नगर, आर.टी.ओ. रोड, कुवारबाव. रत्नागिरी. ( शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी. 11 ते सायंकाळी 05 या वेळेत 9834015522 / 02352 – 299191 क्रमांकावर संपर्क करणे व अर्ज भरण्यास येणे.)

Related Articles

3 Comments

Back to top button
error: Content is protected !!