औरंगाबाद :सत्तेत असून सुद्धा कष्टकरी कामगारांचे प्रश्न काँग्रेस पक्षाकडून सोडवले जात नसून कोविडच्या नावाखाली कामगारांच्या पोटावर लात मारण्याचे काम कॉंग्रेस करीत असल्याचा निषेध करीत असंघटीत कामगार काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजू देहाडे यांच्या समवेत शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता फारूक अहमद, प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संगठनेचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग ससाणे, मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते मिलिंद दाभाडे, युवा आघाडी चे जिल्हाध्यक्ष सतिश गायकवाड, शहराध्यक्ष (पुर्व) डॉ जमील देशमुख, शहराध्यक्ष (मध्य) जलीस अहमद, युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सतिश शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष (पुर्व) अफसरखान पठाण, जिल्हा उपाध्यक्ष (पश्चिम) प्रा. अब्दुल समद, जिल्हा उपाध्यक्ष (पश्चिम) रुपचंद गाडेकर, युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सलीम पटेल, शहर महासचिव भगवान खिल्लारे सह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते प्रवेश घेतलेले कामगार नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1
1