पूर्व प्राथमिक शिष्यवृत्तीच्या परीक्षेत नूतन विद्यालय तालुक्यातुन अव्वल;कु.पूर्वा शाम चोपडे ही तालुक्यातुन प्रथम तर जिल्यातुन नववी
पूर्व प्राथमिक शिष्यवृत्तीच्या परीक्षेत नूतन विद्यालय तालुक्यातुन अव्वल;
कु.पूर्वा शाम चोपडे ही तालुक्यातुन प्रथम तर जिल्यातुन नववी
मलकापूर- उमेश इटणारे
मलकापूर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्तीच्या परीक्षेत नूतन विद्यालयाने तालुक्यातुन अव्वल यश प्राप्त केले आहे. या विद्यालयातील विद्यार्थ्यानी कु.पूर्वा शाम चोपडे ही तालुक्यातुन प्रथम तर जिल्यातुन नववी आली आहे.
जयेश प्रमोद मैंद हा विद्यार्थी तालुक्यातुन तिसरा तर जिल्ह्यातुन सोळावा तसेच कु. ईश्वरी लक्ष्मण जावळे ही विद्यार्थी तालुक्यातुन चौथी आली आहे.
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु.साक्षी अतुल पाटील तालुक्यातुन दुसरी तर जिल्ह्यातुन २७वी व कु.तृषा गोविंद बारी तालुक्यातुन चौथी तर जिल्ह्यातुन १२६ वी आली आहे. या यशस्वी विध्यार्थ्यांचा नूतन विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.यशस्वी विद्यार्थी यशाचे श्रेय आपले आई वडील आणि गुरुजनांना देतात.
1