25.6 C
Kolhāpur
Homeक्राइमरत्नागिरी : मिरकरवाडा जेटी परिसरात मासे घेण्याच्या वादातून महिलेच्या घातला डोक्यात दगड

रत्नागिरी : मिरकरवाडा जेटी परिसरात मासे घेण्याच्या वादातून महिलेच्या घातला डोक्यात दगड

रत्नागिरी : मिरकरवाडा जेटी येथे मासे घेण्याच्या वादातून महिलेच्या डोक्यात दगड घालून तिला जखमी केल्याप्रकरणी माय – लेकांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ही घटना सोमवारी , ११ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता घडली . कासम सोलकर व त्याच्या आई ( दोघेही रा . मिरकरवाडा खडप मोहल्ला , रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत . त्यांच्याविरोधात नजमा इरफान मुकादम ( ५० , रा . पांजरी मोहल्ला मिरकरवाडा , रत्नागिरी ) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे . त्यानुसार , सोमवारी दुपारी त्या पती व मुलासोबत मिरकरवाडा जेटी येथे मासे खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या . त्यावेळी तेथील लाँच मालक डांगे यांच्याकडील म्हाकुळ मासा घेण्यासाठी वजन करत असताना कासम सोलकर आपल्या आई सोबत तिथे आला . त्याने डांगे यांना मी तुम्हाला म्हाकुळेच जास्त पैसे देतो असे म्हणत वजन काट्यावरील म्हाकुळ घेउन गेला . यावरुन नजमा मुकादम आणि कासमची आई यांच्यात वाद सुरु झाला . तेव्हा कासम सोलकरने पुन्हा तिथे येउन नजमा मुकादम यांना शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यात दगड मारुन तुला बघून घेतो अशी धमकी दिली . याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार राठोड करत आहेत .

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा