28.3 C
Kolhāpur
Homeक्राइमरत्नागिरी शहरानजीक काजरघाटी बस स्टॉपमागे जुगार अड्ड्यावर दोघांना अटक

रत्नागिरी शहरानजीक काजरघाटी बस स्टॉपमागे जुगार अड्ड्यावर दोघांना अटक

रत्नागिरी : शहरातील एसटी बस स्टँडलगत तसेच काजरघाटी येथील एसटी बस स्टॉपच्यामागे जुगार खेळ चालवणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ही कारवाई सोमवार ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली असून संशयितांकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . आशिष अनिल लांजेकर ( ३२ , रा . तांबटआळी , रत्नागिरी ) आणि संदीप गणपत चंदरकर ( रा . शांतिनगर , रत्नागिरी ) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत . त्यांच्याविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल बाळू पालकर आणि पोलिस हवालदार प्रशांत बोरकर यांनी तक्रार दिली आहे . याबाबत अधिक तपास शहर पोलिस करत आहेत .

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा