25.6 C
Kolhāpur
Homeरत्नागिरीखेड तहसीलदार कार्यलयासमोर तलाठी संघटनेचे धरणे आंदोलन

खेड तहसीलदार कार्यलयासमोर तलाठी संघटनेचे धरणे आंदोलन

रत्नागिरी : खेड येथील जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणेचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांच्या निषेधार्थ रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाच्या खेड येथील कार्यकर्त्यांनी सोमवारी खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन केले .
जगताप यांची राज्य समन्वयक पदावरून अन्यत्र बदली करावी , अन्यथा दि , १३ ऑक्टोबरपासून कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला . खेड येथे सोमवारी तलाठी संघटनेच्या एक दिवसीय आंदोलनात तलाठी , मंडल अधिकारी , तलाठी संवर्गातील कारकून , नायब तहसीलदार यांनी सहभाग घेतला होता . जगताप यांनी असंवाधनिक भाषेचा वापर केल्याच्या कृत्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले असून , राज्यातील तलाठी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे . शासनाने त्यांची समन्वयक पदावरून तत्काळ उचलबांगडी करून अन्यत्र बदली करावी , ही प्रमुख मागणी यावेळी तलाठी संघाने शासनाकडे केली आहे . तसेच राज्याचे मंत्री , राज्यमंत्री , खासदार , आमदार यांना निवेदन देण्यात येणार आहे . तरीही समन्वयक पदावरून अन्यत्र जगताप यांची बदली झाली नाही , तर दि . १३ ऑक्टोबरपासून सर्व कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष उमेश भोसले यांनी दिला आहे .

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा