25.6 C
Kolhāpur
Homeक्राइममधमाश्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

मधमाश्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील नांदीवडे वेलवाडी येथे मधमाशा चावल्याने महिलेचा मृत्यू झाला. सुनीता चंद्रकांत गुरव (65, रा. नांदीवडे घोघळवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सुनीता या नांदीवडे येथील उदय दामोदर जोग (60) यांच्या आंबा बागेमध्ये साफसफाईचे काम करत होत्या. 6 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांना बागेमध्ये काम करत असताना मधमाश्या चावल्या होत्या यावेळी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय याठिकाणी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सुनीता गुरव यांचा मृत्यू झाला याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा