25.6 C
Kolhāpur
Homeक्राइमपिकअप व्हॅनच्या धडकेत झालेल्या अपघातात मुलगा जखमी

पिकअप व्हॅनच्या धडकेत झालेल्या अपघातात मुलगा जखमी

दापोली-मंडणगड मार्गावरील दापोली शहरातील खोंडा भागातील पेट्रोल पंपाजवळ एक पिकअपने रस्ता ओलांडणार्‍या सात वर्षाच्या मुलाला धडक दिली. हा मुलगा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.
दापोली शहरातील खोंडा परिसरात राहणार्‍या गजाला शेकासन या स्कूलबसमधून येणार्‍या त्यांच्या मुलाला नेण्यासाठी रस्त्यावर उभ्या होत्या. सोबत त्यांचा दुसरा मुलगा इब्राहीम शेकासन (७) होता. त्यांच्या मुलाची बस मंडणगडच्या बाजूने येवून थांबली व मुलगा बसमधून खाली उतरला. त्यानंतर इब्राहीम रस्ता ओलांडून पलिकडे जात असताना बोरीवली येथून घर सामान घेवून येणार्‍या महिंद्रा पिकअपची (एमएच ४७ वाय ९५९९) धडक त्याला बसली व त्याच्या डोक्याला दुखापत झाली. हा अपघात शनिवार दि. ९ रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास झाला.अपघातानंतर पीकअप चालक बसस्थानकात हजर झाला.

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा