25.6 C
Kolhāpur
Homeक्रीडादिव्यांग टी- 20 त्रिकोणी मालिकेतील विजयी विदर्भ संघाचा कर्णधार नागेश इंगळे याची...

दिव्यांग टी- 20 त्रिकोणी मालिकेतील विजयी विदर्भ संघाचा कर्णधार नागेश इंगळे याची भारताच्या पश्चिम विभागीय क्रिकेट संघात निवड

मलकापूर – दिपक इटणारे

नुकत्याच मलकापूर येथे संपन्न झालेल्या दिव्यांग t20 त्रिकोणी मालिकेतील विजयी विदर्भ संघाचा कर्णधार नागेश इंगळे याची भारताच्या पश्चिम विभागीय क्रिकेट संघात निवड करण्यात आल्याची माहिती पश्चिम विभागाचे समन्वयक धीरज भारदे यांनी घोषित केले आहे .दिनांक 17 18 व 19 नोव्हेंबरला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे होणाऱ्या देशातील पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या सर्व विभागांच्या जे क्रिकेट सामने होणार आहेत त्यासाठी नागेश इंगळे ची जलद गोलंदाज म्हणून संघात निवड झाली आहे पश्चिम विभागात विदर्भ, मुंबई, उर्वरित महाराष्ट्र व गुजरात येथील खेळाडू चा समावेश असतो. नागेश इंगळे हा नांदुरा येथील खेळाडू असून प्रशिक्षक राजेश भोसले यांच्या अथक प्रयत्नातून नागेश ला सरावाची संधी मिळालेली आहे ,तो बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव खेळाडू असून त्याने नुकत्याच संपलेल्या तिरंगी मालिकेत चार चेंडूत चार बळी महाराष्ट्र संघाचे मिळविले होते. त्यास पुढील सामन्यांमध्ये दर्जेदार कामगिरी करता यावी म्हणून मलकापूर येथील क्रिकेट प्रशिक्षण केंद्रात त्याला सरावाची संधी उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती प्रशिक्षक चंद्रकांत साळुंके यांनी दिली आहे नागेश इंगळे च्या निवडीबद्दल आमदार राजेश एकडे,जिल्हा दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष गणेश जाधव व जिल्ह्यातील इतर मान्यवरांनी त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा