25.6 C
Kolhāpur
HomeमनोरंजनBigg Boss Marathi 3 Episodes, 10 Oct: तिला वाटतं तिच्याच मताने सगळं...

Bigg Boss Marathi 3 Episodes, 10 Oct: तिला वाटतं तिच्याच मताने सगळं होतं; स्नेहाने फोडला मीराच्या डोक्यावर भोपळा

काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात (Bigg Boss Marathi 3) आता अनेक रंगतदार वळणं येत असल्याचं पाहायला मिळत आहे. घरात तीन नवे ग्रुप तयार झाले असून या ग्रुपमध्ये सतत घरातील अन्य सदस्यांविषयी गॉसिपिंग सुरु असतं. एकीकडे घरातील सदस्यांचं गॉसिपिंग सुरु असतानाच काही सदस्यांमध्ये शितयुद्ध सुरु असल्याचंही पाहायला मिळतं. यामध्येच हे पर्व सुरु झाल्यापासून स्नेहा वाघ (sneha wagh)  आणि मीरा जगन्नाथ (meera jagnnath) या दोघांनीमध्ये वाद होताना दिसतात. इतकंच नाही तर आज होणाऱ्या बिग बॉसच्या चावडीवर स्नेहा मीराच्या डोक्यावर भ्रमाचा भोपळा फोडणार आहे.

‘बिग बॉस’च्या चावडीवर आज  स्पर्धकांमध्ये भ्रमाचा भोपळा हा नवा टास्क रंगणार आहे. यामध्ये घरातील ज्या व्यक्तीविषयी तक्रार आहे तिच्या डोक्यावर भ्रमाचा भोपळा फोडून कोणती गोष्ट खटकली हे सांगायचं आहे. यामध्ये स्नेहा मीराच्या डोक्यावर फोडणार आहे.

“मला हा भ्रमाचा भोपळा मीराच्या डोक्यावर फोडायचा आहे.  तीन आठवडे झाले आहेत खेळ सुरु होऊन पण अजून सुद्धा मीराचं आमचा ग्रुप, आम्ही हे करतो, आम्ही तसं करतो असं सुरु असतं. तिला असं वाटतंय की सगळा ग्रुप तिच्या हिशोबाने चालतो किंवा  तिच्याच मताने सगळं होतं. पण तसं नाहीये. त्यामुळे हा भोपळा मला तिच्या डोक्यावर फोडायचा आहे”, असं स्नेहा सांगते.

दरम्यान, स्नेहाने मीराच्या डोक्यावर भोपळा फोडल्यानंतर महेश मांजरेकर मीराला भोपळा फोडण्याची संधी देतात. परंतु, जर भोपळा फोडायचाच असेल तर घरातील प्रत्येकावरच फोडावा लागेल. कारण, माझ्याविषयी प्रत्येकाचेच खूप भ्रम आहेत, असं मीरा सांगते. त्यामुळे आता मीरा घरातील सदस्यांवर हा भोपळा फोडणार की नाही हे आजच्या बिग बॉसच्या चावडीवरच पाहायला मिळणार आहे.

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा