28.3 C
Kolhāpur
Homeकोल्हापूरविद्या मगदूमने पटकावली दोन सुवर्णपदके ; शहीद महाविद्यालयासाठी आणखी एक सुवर्णक्षण

विद्या मगदूमने पटकावली दोन सुवर्णपदके ; शहीद महाविद्यालयासाठी आणखी एक सुवर्णक्षण

विद्या मगदूमने पटकावली दोन सुवर्णपदके

शहीद महाविद्यालयासाठी आणखी एक सुवर्णक्षण

तिटवे:
येथील शहीद विरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय येथे बीसीए मध्ये शिकत असलेल्या विद्या मगदूम या विद्यार्थिनीने नॅशनल इन्व्हिटेशन कराटे चँपियनशिप या स्पर्धेमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली. शोतोकन कराटे- डू असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत गोवा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दि. ३ ऑक्टोबर २०२१ ही स्पर्धा घेण्यात आली होती. कुमेती आणि कता या दोन कराटे प्रकारांमध्ये वीस वर्षे वयोगटासाठी खेळत तिने दोन सुवर्णपदकांची कमाई केली. वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या शहीद महाविद्यालयासाठी या आणखी एका सुवर्ण क्षणाची भर पडली आहे.
विद्याच्या या यशाबद्दल राधानगरी आणि चुये परिसरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या यशासाठी तिचे कोच रमेश पिसाळ यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालायचे प्राचार्य प्रशांत पालकर, संस्थेच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील आणि संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा