28.3 C
Kolhāpur
Homeकोल्हापूररेकॉर्डवरील नेपाळी गुन्हेगाराला पोलीसांनी केली अटक ;२२ हजार ३५ रुपयेचा चरस जप्त

रेकॉर्डवरील नेपाळी गुन्हेगाराला पोलीसांनी केली अटक ;२२ हजार ३५ रुपयेचा चरस जप्त

अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील एका नेपाळी गुन्हेगाराला शुक्रवारी (दि.8) रात्री उशिरा अटक केली. विक्रम नरबहादुर मगर उर्फ थापा ( वय ४० , रा . भुटवल . जि . भुटवल देश – नेपाळ) असे त्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून २२ हजार ३५ रुपये किमतीचा चरस हा अंमली पदार्थ जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शहरातील मध्यवती बस स्थानका समोरील एका हॉटेल नजीक केली.

विक्रम नरबहादुर मगर उर्फ थापा हा रेकॉर्ड गुन्हेगार असून, त्याच्या विरूध्द कर्नाटक राज्यातील बेळगांव जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विषयी गुन्हा नोंद आहे. कर्नाटक पोलिसांनी त्याच्याकडून ३ सुमारे साडेतीन किलो चरस जप्त केला होता. या प्रकरणी त्याला न्यायालयाने दोषी धरुन जन्मठेपी शिक्षा ठोठावली आहे. तो गेल्या आठ वर्षापासून बेळगाव येथील हिंडलगा कारागृहात शिक्षा भोगत आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आला असून, तो इचलकरंजीत चरस विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा लावून अटक केली

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा